मुरबाड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुरबाड विधानसभा मतदारसंघ - १३९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मुरबाड मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील १. मुरबाड तालुका, २. कल्याण तालुक्यातील टिटवाळा आणि नाडगांव महसूल मंडळ, ३. अंबरनाथ तालुक्यातील गोरेगांव, बदलापूर ही महसूल मंडळे आणि कुळगांव बदलापूर नगरपालिका, अंबरनाथ महसूल मंडळ (भाग) मांजली सझा, खरवई सझा यांचा समावेश होतो. मुरबाड हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे किसन शंकर कथोरे हे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

मुरबाड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ किसन शंकर कथोरे भारतीय जनता पक्ष
२०१४ किसन शंकर कथोरे भारतीय जनता पक्ष
२००९ किसन शंकर कथोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]