महाराष्ट्र विधानसभा
महाराष्ट्र विधानसभा | |
---|---|
![]() | |
१४वी महाराष्ट्र विधानसभा | |
प्रकार | |
प्रकार | द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ |
इतिहास | |
नेते | |
अध्यक्ष |
राहुल नार्वेकर (०३ जुलै २०२२ पासून), भारतीय जनता पार्टी २०१९ |
उपध्यक्ष |
झिरवाळ नरहरी सिताराम (०९ मार्च २०२० पासून), एनसीपी २०१९ |
सभागृह नेता |
एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री), शिवसेना २०१९ |
सभागृह उप नेता |
देवेंद्र फडणवीस (उप मुख्यमंत्री), भाजप २०१९ |
विरोधी पक्षनेता |
अजित पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २०१९ |
उप विरोधी पक्षनेता |
बाळासाहेब थोरात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
संरचना | |
सदस्य | २८८ |
राजकीय गट |
भाजप (१०५) शिवसेना (४०) काँग्रेस (४५) राष्ट्रवादी (५३) शिवसेना उबाठा (१७) बविआ (३) एमआयएम (१) भारिपबम (१) मनसे (१) रासप (१) भाकप (१) अपक्ष (१३) शेकाप (१) |
निवडणूक | |
मागील निवडणूक | १५ ऑक्टोबर २०१४ |
बैठक ठिकाण | |
Vidhan_bhavan_mumbai2.JPG | |
मुंबई, नागपूर | |
संकेतस्थळ | |
महाराष्ट्र विधानसभा संकेतस्थळ | |
तळटिपा | |
महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे.
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली व त्यानंतर थोड्याच दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर जून-जुलै २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि (बाळासाहेबांची शिवसेना) (शिंदे गट) व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली.
यादी[संपादन]
क्रम | निवडणूक वर्ष | सभापती | मुख्यमंत्री | जागा |
---|---|---|---|---|
पहिली विधानसभा | इ.स. १९६० | सयाजी सिलम | यशवंतराव चव्हाण (काँग्रेस) | |
दुसरी विधानसभा | १९६२ | त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे | मारोतराव कन्नमवार वसंतराव नाईक (काँग्रेस) |
काँग्रेस: २१५/२६४; शेकाप: १५ |
तिसरी विधानसभा | १९६७ | त्र्यंबक शिवराम भारदे | वसंतराव नाईक (काँग्रेस) | काँग्रेस: २०३/२७० |
चौथी विधानसभा | १९७२ | एस.के. वानखेडे बाळासाहेब देसाई |
वसंतराव नाईक (काँग्रेस) शंकरराव चव्हाण (काँग्रेस) वसंतदादा पाटील (काँग्रेस) |
काँग्रेस: २२२; शेकाप: ७ |
पाचवी विधानसभा | १९७८ | शिवराज पाटील प्राणलाल व्होरा |
वसंतदादा पाटील (काँग्रेस) शरद पवार (बंडखोर काँग्रेस) राष्ट्रपती राजवट |
जनता पक्ष: ९९/२८८; काँग्रेस: ६९; काँग्रेस (आय): ६२ |
सहावी विधानसभा | १९८० | शरद दिघे | ए.आर. अंतुले (काँग्रेस) बाबासाहेब भोसले (काँग्रेस) वसंतदादा पाटील (काँग्रेस) |
काँग्रेस: १८६/२८८; शरद काँग्रेस: ४७; जनता पक्ष: १७; भाजप: १४ |
सातवी विधानसभा | १९८५ | शंकरराव जगताप | शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस) शंकरराव चव्हाण (काँग्रेस) शरद पवार (काँग्रेस) |
काँग्रेस: १६१; शरद काँग्रेस: ५४; जनता पक्ष: २०; भाजप: १६ |
आठवी विधानसभा | १९९० | मधुकरराव चौधरी | शरद पवार (काँग्रेस) सुधाकरराव नाईक (काँग्रेस) शरद पवार (काँग्रेस) |
काँग्रेस: १४१/२८८ शिवसेना + भाजप: ५२+४२ |
नववी विधानसभा | १९९५ | दत्ताजी नलावडे | मनोहर जोशी नारायण राणे (शिवसेना) |
शिवसेना: ७३ + भाजप: ६५; काँग्रेस: ८०/२८८ |
दहावी विधानसभा | १९९९ | अरुण गुजराथी | विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) |
काँग्रेस: ७५ राष्ट्रवादी: ५८ शिवसेना + भाजप: ६९+५६ |
अकरावी विधानसभा | २००४ | बाबासाहेब कुपेकर | विलासराव देशमुख अशोक चव्हाण (काँग्रेस) |
काँग्रेस + राष्ट्रवादी: ६९+७१ शिवसेना+भाजप: ६२+५४ |
बारावी विधानसभा | २००९ | दिलीप वळसे-पाटील | अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) |
काँग्रेस + राष्ट्रवादी: ८२+६३ शिवसेना+भाजप = ४६+४६ मनसे: १३ |
तेरावी विधानसभा | २०१४ | हरिभाऊ बागडे | देवेंद्र फडणवीस (भाजप) | भाजप: १२२ शिवसेना: ६३ काँग्रेस: ४२ राष्ट्रवादी: ४१ मनसे ०१ |
चौदावी विधानसभा | २०१९ |
नाना पटोले (२०१९-२०२२) |
देवेंद्र फडणवीस(भाजप), उद्धव ठाकरे(शिवसेना), एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना), |
भाजप (१०५) शिवसेना (५५) काँग्रेस (४५) राष्ट्रवादी (५३) मनसे (०१) |
बाह्य दुवे[संपादन]
- महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)