खडकवासला विधानसभा मतदारसंघ
खडकवासला विधानसभा मतदारसंघ - २११ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खडकवासला मतदारसंघात हवेली तालुक्यातील खेड शिवापूर महसूल मंडळ (पुणे महानगरपालिका हददीत समाविष्ट केलेले क्षेत्र वगळता) आणि पुणे महानगरपालिकेच्या (भाग) खेड शिवापूर महसूल मंडळातील नऱ्हे गांव ( पुणे महानगरपालिका वॉर्ड क्र. १४३), खेड शिवापूर महसूल मंडळातील नांदेड गांव (वॉर्ड क्र. १४६), खेड शिवापूर महसूल मंडळातील किरकट वाडी गांव (वॉर्ड क्र. १४७), खेड शिवापूर महसूल मंडळातील खडकवासला गांव (वॉर्ड क्र. १४८), हवेली तालुक्यातील कोथरुड महसूल मंडळ (पुणे महानगरपालिका हददीत समाविष्ट केलेले क्षेत्र वगळता), कोथरुड महसूल मंडळातील शिवणे गांव (पुणे महानगरपालिका वॉर्ड क्र. १५२), कोथरुड महसूल मंडळातील उत्तमनगर गांव (वॉर्ड क्र. १५३), कोथरुड महसूल मंडळ विभागातील कोपरे गांव (वॉर्ड क्र. १५४), कोथरुड महसूल मंडळातील कोंढवे धावडे गांव (वॉर्ड क्र. १५५) आणि पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ३१, १४०, १४४, १४५, १४९, १५१, १५६ आणि १५८ यांचा समावेश होतो. खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे भिमराव धोंडिबा तापकीर हे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | भिमराव धोंडिबा तापकीर | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | भिमराव धोंडिबा तापकीर | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | रमेश हिरामण वांजळे | महाराष्ट्र नवनिर्माण सेना |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
खडकवासला | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रमेश हिरामण वांजळे | मनसे | ७९००६ |
विकास पंढरीनाथ दांगट | राष्ट्रवादी | ५६४८८ |
मुरलीधर किसन मोहोळ | भाजप | २९१७१ |
सोमनाथ शंकर लांडगे | अपक्ष | ४३९२ |
SIDDHU HANUMANTA KAMBLE | रिपाई (A) | १७२८ |
SHELAR BABAJI SITARAM | बसपा | १३७८ |
ADVOCATE SUBHASH NARAHAR GODSE | अपक्ष | ९९० |
YOGESH SONABA RANDHIR | अपक्ष | ७०० |
BALASAHEB KONDIBA GHOGARE | अपक्ष | ६९६ |
DR. SMITA SOMNATH POL | भाबम | ५७१ |
DR. SADHANA PANDIT POL | अपक्ष | ४९३ |
DILIP SUDAM KOLEKAR | अपक्ष | २२७ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |