"ऐश्वर्य पाटेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५१: ओळ ५१:


==जू==
==जू==
साहित्य अकादमीचा युवा साहित्यिकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या ऐश्‍वर्य पाटेकर यांचे हे आत्मकथन आहे. छोट्या खेड्यात राहणाऱ्या आणि आईने अफाट कष्ट करून वाढवलेल्या पाटेकर यांनी आपला बालपणातला संघर्ष तर इथे सांगितला आहेच; पण आईने किती हाल सोसले आणि तरीही मुलाला शिकवून मोठे करायचे हा निर्धार कसा पूर्ण केला तेही सांगितलॆ आहे.
साहित्य अकादमीचा युवा साहित्यिकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या ऐश्‍वर्य पाटेकर यांचे हे आत्मकथन आहे. छोट्या खेड्यात राहणाऱ्या आणि आईने अफाट कष्ट करून वाढवलेल्या पाटेकर यांनी आपला बालपणातला संघर्ष तर इथे सांगितला आहेच; पण आईने किती हाल सोसले आणि तरीही मुलाला शिकवून मोठे करायचे हा निर्धार कसा पूर्ण केला तेही सांगितलॆ आहे. हे पुस्तक सकाळ प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.


===भुईशास्त्र===
===भुईशास्त्र===
ओळ ६४: ओळ ६४:


{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = डॉ. केशव सखाराम | आडनाव = देशमुख | लेखक = | सहलेखक = | शीर्षक = कवितारती | मालिका = पुस्तक क्रमांक ११३, ११४ | प्रकरण = शेतीचा नवा सूत्रपाठ सांगणारी कविता | भाषा = | संपादक = पुरूषोत्तम पाटील | प्रकाशक = | आवृत्ती = | दिनांक = | महिना = | वर्ष = मार्च-एप्रिल, मे-जून २०११ | फॉरमॅट = | अन्य = (आवृत्तीविषयक इतर माहिती) | पृष्ठ = ४० | पृष्ठे = | आयएसबीएन = | दुवा = | संदर्भ = | अ‍ॅक्सेसदिनांक = | अ‍ॅक्सेसमहिना = | अ‍ॅक्सेसवर्ष = | अवतरण = }}</ref>
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = डॉ. केशव सखाराम | आडनाव = देशमुख | लेखक = | सहलेखक = | शीर्षक = कवितारती | मालिका = पुस्तक क्रमांक ११३, ११४ | प्रकरण = शेतीचा नवा सूत्रपाठ सांगणारी कविता | भाषा = | संपादक = पुरूषोत्तम पाटील | प्रकाशक = | आवृत्ती = | दिनांक = | महिना = | वर्ष = मार्च-एप्रिल, मे-जून २०११ | फॉरमॅट = | अन्य = (आवृत्तीविषयक इतर माहिती) | पृष्ठ = ४० | पृष्ठे = | आयएसबीएन = | दुवा = | संदर्भ = | अ‍ॅक्सेसदिनांक = | अ‍ॅक्सेसमहिना = | अ‍ॅक्सेसवर्ष = | अवतरण = }}</ref>

पहा : [http://indianyoungwriters.blogspot.in/2013/08/blog-post_295.html Indian Young Writers]

[[वर्ग:मराठी लेखक]]


==ऐश्वर्य पाटेकर यांचे कवितासंग्रह==
==ऐश्वर्य पाटेकर यांचे कवितासंग्रह==

०४:३०, ३ मे २०१६ ची आवृत्ती

ऐश्वर्य पाटेकर
जन्म नाव ऐश्वर्य नामदेव पाटेकर
जन्म १४ एप्रिल, १९७७
पाटे, ता.चांदवड, जि.नाशिक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्राध्यापक, काव्यक्षेत्र
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, एकांकिका
प्रसिद्ध साहित्यकृती भुईशास्त्र
वडील नामदेव
आई इंदूबाई
पुरस्कार साहित्य अकादमी युवा पुरस्कार

ऐश्वर्य पाटेकर (जन्म - १४ एप्रिल, १९७७ हयात) हा त्याच्या 'भुईशास्त्र' या पहिल्याच काव्यसंग्रहासाठी मराठी साहित्यासाठीचा पहिला[१] साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला कवी आहे.

जीवन

ऐश्वर्य नामदेव पाटेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील पाटे या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. नामदेव आणि इंदूबाई या दांपत्याला ऐश्वर्य हा मुलगा आणि चार मुली होत्या. आपल्या वडिलांकडून आईला होणारी मारहाण आणि तिचे आक्रंदन ऐश्वर्यला लहानपणीच अनुभवायला मिळाले. शेवटी बडिलांनी दुसरे लग्न केले आणि ऐश्वर्याला आणि त्याच्या आईला घराबाहेर काढले. आईने मोलमजुरी करून मुलांना वाढविले.[२] ऐश्वर्य पाटेकर यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात असताना त्यांचे शिक्षक श्री. पवार यांनी ’प्रेरणा’ नावाचे हस्तलिहित काढायचे ठरविले. दहा वर्षे वयाच्या ऐश्वर्यने त्यासाठी स्वतः लिहिलेल्या कविता दिल्या असता त्या कविता ऐश्वर्यने लिहिलेल्या आहेत यावर शिक्षकांचा विश्वास बसला नाही, म्हणून त्यांनी त्या कविता नाकारल्या होत्या. पाटेकरांचे माध्यमिक शिक्षण काझीसांगवी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लासलगाव आणि नाशिक येथे झाले. एम.ए., बी.एड., एम.फिल. पदव्या मिळाल्यावर पाटेकर इ.स. २००४ पासून निफाड तालुक्यातील काकासाहेबनगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात मराठीचा व्याख्याता म्हणून लागले. तेथे असताना ऐश्वर्य पाटेकर यांनी ’भुईशास्त्र’ हा काव्यसंग्रह लिहिला.

आपण लिहिलेल्या कविता त्यांनी आनंद यादव, शंकर वैद्य, म.सु. पाटील अरुणा ढेरे, इंद्रजित भालेराव, द.ता. भोसले, लक्ष्मीनारायण बोल्ली, पुरुषोत्तम पाटील आदी साहित्यिकांना पाठवल्या व त्यांच्या प्रतिसादावरून पाटेकरांना आपल्या कवितांतील गुणदोष उमजले.

लेखन

ऐश्वर्य पाटेकर यांचा भुईशास्त्र हा कवितासंग्रह आहे. शिवाय ’कवितारती’, आणि ’अनुष्टुभ’ यांसारख्या अनेक नियतकालिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.

ऐश्वर्य पाटेकर यांच्या आत्मकथनात्मक कादंबरीची प्रकरणे ’ॲग्रोवन’च्या अंकात दर रविवारी प्रकाशित होतात.

जू

साहित्य अकादमीचा युवा साहित्यिकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या ऐश्‍वर्य पाटेकर यांचे हे आत्मकथन आहे. छोट्या खेड्यात राहणाऱ्या आणि आईने अफाट कष्ट करून वाढवलेल्या पाटेकर यांनी आपला बालपणातला संघर्ष तर इथे सांगितला आहेच; पण आईने किती हाल सोसले आणि तरीही मुलाला शिकवून मोठे करायचे हा निर्धार कसा पूर्ण केला तेही सांगितलॆ आहे. हे पुस्तक सकाळ प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

भुईशास्त्र

ऐश्वर्य पाटेकरने लिहिलेला हा कवितासंग्रह जानेवारी, २०११ ला श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. 'भुईशास्त्र'तील कविता संवादी, सात्त्विक आणि स्वाभाविकपणाची लक्षणे असणारी आणि संतांच्या परंपरेशी जोडलेली आहे.[३] या यंग्रहाची एकूण रचना ऐश्वर्यने 'दृष्टान्तपाढे', 'वृषभलीळा', 'भुईशास्त्र', 'गर्भओवी' आणि 'हुर्दुकटीपा' या विभागात केलेली आहे. दृष्टान्तपाढे या संग्रहाच्या प्रारंभीच्या कविता विभागात कष्टकरी-शेतकरी वर्गाच्या सर्व प्रकारच्या अवस्था आणि अवकळा मांडलेल्या आहेत. वृषभलीळा या विभागाअंतर्गत समाविष्ट पाटेकरच्या कविता शेतकर्‍यांचा जिवलग बैल या विषयावर आहेत. भुईशास्त्र या विभागात विभागलेल्या कविता वारकरी संस्कार व्यक्त करणार्‍या आहेत तर आईवरच्या कवितांचा हुर्दुकटीपा हा विभाग जास्त प्रभावी आहे. ऐश्वर्यच्या जीवनाचे, जगण्याचे संस्काराचे सारे सार हुर्दुकटीपेतच सामावलेले आहे.[४]

पहा : Indian Young Writers

ऐश्वर्य पाटेकर यांचे कवितासंग्रह

  • भुईशास्त्र
  • मी माझ्यात माझं अख्खं गाव घेऊन फिरतो आहे

प्रसिद्ध कविता

  • भाकर आणि आई
  • मास्तर
  • गव्हाच्या ओंबीत बाजरीचे दाणे[५]
  • मुंगीचिया विवरी

पुरस्कार

  • भुईशास्त्र या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार[६] - साहित्य अकादमीच्या सांस्कृतिक मंडळातर्फे. (इ.स. २०१२)
  • यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार[७][८] - पुणे येथील प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्रमंडळातर्फे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी. (इ.स. २०१२)
  • रा. ना. पवार साहित्य पुरस्कार[९] - सोलापूर येथील रा.ना. पवार प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी. (इ.स. २०११)
  • संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार [१०] - वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे. (इ.स. २०१२)
  • सुजाता पाबरेकर स्मृती पुरस्कार
  • आनंद जोर्वेकर स्मृती पुरस्कार[११] - (इ.स. २०००)
  • कवी गोविंद पुरस्कार - सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचेकडून (इ.स. १९९९)
  • संजय कोरंबे स्मृती पुरस्कार - जालना (इ.स. १९९९)
  • रेव्हरंड टिळक पुरस्कार - नाशिक (इ.स. २००९)
  • त्यांच्या ’बाप’ या कथेस इ.स. २००० साली सकाळच्या दिवाळी अंक कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता.
  • त्यांनी 'रघु गुळवे अर्थात बडबड भारूड' आणि 'आदी' या एकांकिकाही लिहिलेल्या आहेत. 'रघु गुळवे अर्थात बडबड भारूड'ला इ.स. २००३ साली झी मराठी आयोजित एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचा एकांकिका महाकरंडक तर 'आदी'ला इ.स. २००३ सालीच सर्वोत्कृष्ट लेखकासाठीचा सायबा करंडक मिळालेला आहे.

संकीर्ण

इ.स. २००० साली झी मराठीच्या घर कवितांचे या दोन भागांच्या कार्यक्रमात ऐश्वर्य पाटेकरांचा सहभाग होता.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.esakal.com/esakal/20120215/5224882669512426630.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.saamana.com/2012/February/18/stambhalekh.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-2/%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/48258. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ देशमुख, डॉ. केशव सखाराम. p. ४०. Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://uniquefeatures.in/e-sammelan/poems/%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11888623.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ http://archive.is/iuwT. Archived from the original on २६ फेब्रुवारी २०१४. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=141441:2011-03-08-15-10-10&Itemid=1. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10268450.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ http://navshakti.co.in/?p=34587. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=403235. Missing or empty |title= (सहाय्य)