लासलगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लासलगाव
गाव
लासलगाव is located in महाराष्ट्र
लासलगाव
लासलगाव
लासलगावचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 20°9′0″N 74°14′20″E / 20.15°N 74.23889°E / 20.15; 74.23889

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा नाशिक जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,९०६ फूट (५८१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १७,३६०
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


लासलगाव हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे. लासलगाव नाशिक शहराच्या ६० किमी ईशान्येस व मनमाडच्या २८ किमी नैऋत्येस स्थित आहे. लासलगाव मुंबई-नागपूर ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर असून येथे देवगिरी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस इत्यादी अनेक दैनंदिन गाड्या थांबतात.

लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे.

     लासलगावचे श्रीदत्त मंदिर हे पंचक्रोशीत खुप प्रसिद्ध आहे. येथे दर गुरुवारी तसेच दर पोर्णिमा, अमावस्येला दुपारी माध्यान्य आरतीसाठी दुर दुर वरून शेकडो भाविक येत असतात.