वर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्धा
भारतामधील शहर

Viswasanthi Stupa, Wardha.JPG
वर्ध्यामधील विश्वशांती स्तूप
वर्धा is located in महाराष्ट्र
वर्धा
वर्धा
वर्धाचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 20°44′30″N 78°36′20″E / 20.74167°N 78.60556°E / 20.74167; 78.60556गुणक: 20°44′30″N 78°36′20″E / 20.74167°N 78.60556°E / 20.74167; 78.60556

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा वर्धा जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ७६७ फूट (२३४ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,०६,४४४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली सुमारे १.०६ लाख लोकसंख्या असलेले वर्धा शहर कापूस व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.

सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते.

शिक्षण[संपादन]

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा हे वर्ध्यामधील एक हिंदी विद्यापीठ आहे.

वाहतूक[संपादन]

भारतीय रेल्वेचे वर्धा रेल्वे स्थानक हे हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व कोलकात्याकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-नागपूर व दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग जुळतात.