निफाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
निफाड 
भारतातील मानवी वस्ती
माध्यमे अपभारण करा
प्रकार मानवी वसाहती
स्थाननाशिक जिल्हा, नाशिक विभाग, महाराष्ट्र, भारत
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ५६९ ±1 m
२०° ०४′ ४८″ N, ७३° ४८′ ००″ E
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Niphad (es); নিফাদ (bn); Niphad (fr); નિફાડ (gu); Нипхад (ru); निफाड (mr); Niphad (de); Niphad (pt); ニップハッド (ja); Niphad (nl); 尼帕德 (zh-hant); ನಿಫಾಡ್ (kn); నిహాడ్ (te); 니파드 (ko); Niphad (en); نپھاڑ (ur); 尼帕德 (zh-hans); நிபாட் (ta) établissement humain en Inde (fr); населений пункт в Індії (uk); nederzetting in India (nl); भारतातील मानवी वस्ती (mr); Siedlung in Indien (de); human settlement in India (en); human settlement in India (en-gb); human settlement in India (en-ca); οικισμός της Ινδίας (el); مستوطنة في الهند (ar)

निफाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे शहर आहे. निफाड शहर हे तालुक्याच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड अर्थात एक ही पहाड नसलेले. येथे Niphad सहकारी साखर कारखाना आहे तो सध्या तरी बंद आहे, तसेच हे एक मध्य रेल्वेचे स्थानकही आहे.न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड येथे झाला.निफाड तालुक्यात लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. द्राक्ष व ऊस उत्पादनात तालुका अग्रेसर आहे. निफाड शहरात भरपूर तेल गिरण्या आहे. निफाड तालुक्यात निफाड,पिंपळगाव,लासलगाव व ओझर ही शहरे आहे तसेच ग्रामीण भाग देखील सुजलाम सुफलाम आहे. तालुक्यात ओझर येथे मिग विमानाचा (HAL) कारखाना आहे. तालुक्यात नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे, त्याला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हटले जाते. तसेच गोदावरी नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे. येथे कादवा व गोदावरी नद्यांचा संगम होतो. निफाड शहरातून नासिक, औरंगाबाद(संभाजीनगर),चांदवड,सुरत व सिन्नर चहूबाजूंना जाण्यास राज्यमार्ग आहे. सध्या फक्त राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे नासिक व औरंगाबाद(संभाजीनगर) ला जोडणाऱ्या मार्गाचेच चौपदरीकरण झाले ले आहे. निफाड तालुक्यातील निफाड व लासलगाव कांदा व लसूण उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. निफाड तालुक्यास महाराष्ट्राचे कोलिफॉर्निया म्हणून ओळखले जाते.निफाड एक मोठी बाजारपेठ आहे.शहराचे नगरपंचायत कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड शहरास प्राचीन मंदिरांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.ह्या वारशाचे जतन करण्याची गरज व आवश्यकता आहे. तसेच कादवा-विनता या दोन नद्यांचा येथे संगम होतो. तसेच तालुक्यातील भरपूर युवक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कतृत्वाचे ठसे उमटवत आहे. अशाप्रकारे निफाड शहर व तालुका हे विविधतेने नटलेले आहे असे मी येथे नमूद करतो.एक सुजाण नागरिक म्हणून माझ्या शहराचा मला अभिमान आहे.

  1. source by अमित कुंदे-पाटील.

जयहिंद.