श्रीरामपूर
श्रीरामपूर | |
जिल्हा | अहमदनगर |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ८९,२८२ २०११ |
दूरध्वनी संकेतांक | +९१ २४२२ |
टपाल संकेतांक | ४१३७०९ |
वाहन संकेतांक | MH-१७ श्रीरामपूर |
संकेतस्थळ | shrirampurmc.gov.in |
श्रीरामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगरच्या खालोखाल आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचे पण लहान शहर आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
भौगोलिक स्थान
[संपादन]श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात नगर शहरापासून ७० किमी अंतरावर आहे. शहराच्या उत्तरेस कोपरगाव, दक्षिणेस राहुरी, पूर्वेस नेवासा तर पश्चिमेस संगमनेर ही महत्त्वाची शहरे आहेत.
इतिहास
[संपादन]दौंड - मनमाड रेेल्वेमार्गाचे काम सुरू झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील बेेलापूर गावाजवळ रेेेल्वे स्थानक बांधण्यात आले तसेच बेलापूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या हरेगाव येथे महाराष्ट्रातील पहिला सरकारी क्षेत्रातील साखर कारखाना बेलापूर शुगर इंडस्ट्रीज हा १९२० मध्ये सुरू झाला. या कारखान्यामध्ये उत्पादित होणा-या साखरेच्या वाहतुकीसाठी कारखान्यापासुन बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत एक नवी रेल्वेलाइन टाकण्यात आली. मालाची चढ उतार करणारे मजूर रेेेल्वे स्थानक परिसरात राहू लागले. इतरही काही व्यवसाय, दुकाने रेल्वे स्थानकाजवळ सुुरू झाले. हळूूूहळू त्या ठिकाणी नवीन गाव वसण्यास सुरुवात झाली. ते गाव म्हणजेच श्रीराम मंदिराच्या नावावरूनच आजचे श्रीरामपूर शहर हे ओळखले जाते. महाराष्ट्रातील नंबर वन अशी दहा दिवस चालणारी यात्रा ही या श्रीरामपूर शहरात भरते. इ.सन.१९४७ साली श्रीरामपूर नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.
शहरातील सोईसुविधा
[संपादन]श्रीरामपूरचे टाऊन प्लॅनिंग उत्तम असून बस स्टॅन्ड आणि रेल्वे स्थानक एकमेकांपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहेत. गावात उत्तम नागरी व्यवस्था, स्वच्छता आणि मुबलक पाणीपुरवठा असल्याने श्रीरामपूरच्या स्थानिकांचे जीवनमान चांगले आहे. शहरात अद्ययावत सोयींनी परिपूर्ण असे सरकारी व खाजगी दवाखाने आहेत. संत लूक हॉस्पिटल (जर्मन हॉस्पिटल), कामगार हॉस्पिटल ही शहरातील अनेक वर्षांपासून नावाजलेली रुग्णालये आहेत.
दळणवळण
[संपादन]राज्यातील अनेक जिल्हा मुख्यालयांसाठी जसे की मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, सातारा, कोल्हापूर इ. श्रीरामपूरहून थेट बससेवा उपलब्ध आहे.
शिर्डीहून मराठवाडा तसेच विदर्भात जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या बस या श्रीरामपूर मार्गे जातात. त्यामुळे या दोन्ही भागांतील प्रमुख शहरांपर्यंत श्रीरामपूरहून बससेवा उपलब्ध झाली आहे.
राज्यातील अनेक तीर्थक्षेत्र जसे की शिर्डी, पैठण, शेगाव, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, नांदेड इ. श्रीरामपूरसोबत थेट बससेवेने जोडलेली आहेत.
राज्याबाहेरील सूरत, इंदौर या ठिकाणी श्रीरामपूरहून थेट बससेवा उपलब्ध आहे.
श्रीरामपूर हे दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा आहे. अधिक माहितीसाठी पहा बेलापूर रेल्वे स्थानक
शेती
[संपादन]श्रीरामपूरचे हवामान हे उत्तम आहे व शेतीसाठी प्रवरा नदी व त्या वरील पाण्याचे योग्य नियोजन आहे. शेत जमीन सुपीक असल्यामुळे शेतकरी सुखी समाधानी आहे. ऊस व कांदा ही श्रीरामपूर परिसरातील प्रमुख पिके आहेत.
पर्यटन स्थळे
[संपादन]श्रीरामपूर नावाप्रमाणे अस्तित्वात असणारी श्रीराम मंदिर हे या गावाची शान आहे तसेच या मंदिराला लगत जैन मंदिर, हनुमान मंदिर हे परिसरात मंदिर आहे. कालिका माता मंदिर देखील उत्तम आहे. श्रीरामपूरजवळील खंडाळा गावात गणपतीचे अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेले मंदिर आहे. बेेेेेेलापूर येेेेथील केेेेशव गोविंद बन हेदेखील शहरवासियांचे आवडते ठिकाण आहे.
साईबाबांची शिर्डी श्रीरामपूरहून अवघ्या ३५ तेे ४० किमी अंतरावर आहे तर शनी शिंगणापूर साधारण ५५ किमी अंतरावर आहे. श्री क्षेत्र देवगड हे श्रीरामपूरपासून साधारण ३५ किमी अंतरावर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |