सकाळ (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सकाळ
प्रकार दैनिक
आकारमान ७४९ बाय ५९७

मालक प्रतापराव पवार
प्रकाशक सकाळ वृत्तसमूह
संपादक अभिजित पवार
मुख्य संपादक श्रीराम पवार
स्थापना जानेवारी १, १९३२
भाषा मराठी
किंमत ४ रुपये
मुख्यालय भारत पुणे, महाराष्ट्र, भारत
खप १३ लाख
भगिनी वृत्तपत्रे महाराष्ट्र हेराल्ड
गोमंतक टाइम्स
ऍग्रोवन

संकेतस्थळ: ईसकाळ.कॉम


सकाळ (वृत्तपत्र) हे भारताच्या पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.


सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. २१ सप्टेंबर १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आला. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे.

सकाळ वृत्तपत्र समूहाची इतर प्रकाशने:

दैनिके:

नियतकालिके:

दूरचित्रवाणी:

'सकाळ' वृत्तपत्राच्या आवृत्त्या :

 • पुणे
 • मुंबई
 • कोल्हापूर
 • नाशिक
 • अहमदनगर
 • औरंगाबाद
 • धुळे
 • नागपूर
 • नंदुरबार
 • पुणे
 • रत्नागिरी
 • सातारा
 • सोलापूर
 • अकोला
 • बेळगाव
 • जळगाव
 • नांदेड
 • रायगड
 • सांगली
 • सिंधुदुर्ग

'सकाळचे संपादक

 • ना. भि. परुळेकर - १ जानेवारी, १९३२ ते ३१ डिसेंबर, १९४३
 • रामचंद्र बळवंत उर्फ बाबासाहेब घोरपडे - १ जानेवारी, १९४४ ते २० फेब्रुवारी, १९५१
 • ना. भि. परुळेकर - २१ फेब्रुवारी, १९५१ ते ८ जानेवारी, १९७३
 • श्रीधर उर्फ एस. जी. मुणगेकर - ९ जानेवारी, १९७३ ते १४ ऑगस्ट, १९७४ (कार्यकारी संपादक)
 • श्रीधर उर्फ एस. जी. मुणगेकर - १५ ऑगस्ट, १९७४ ते ९ फेब्रुवारी, १९८५ (संपादक)
 • व्ही. डी. रानडे - १० फेब्रुवारी, १९८५ ते ३० एप्रिल, १९८७
 • एस. के. कुलकर्णी - १ मे, १९८७ ते ३१ जुलै, १९८७
 • विजय कुवळेकर - १ ऑगस्ट, १९८७ ते ७ ऑगस्ट, २०००
 • अनंत दीक्षित - ८ ऑगस्ट, २००० ते १५ जुलै, २००५
 • यमाजी मालकर - १६ जुलै, २००५ ते ९ मे, २००९
 • सुरेशचंद्र पाध्ये - १० मे, २००९ ते १ डिसेंबर, २०१०
 • उत्तम कांबळे - १० मे, २००९ ते ३१ जुलै, २०१२ (मुख्य संपादक)
 • श्रीराम पवार - १ ऑगस्ट २०१२ पासून (मुख्य संपादक)

सकाळ टुडे स्थानिक पातळीवरील बातम्यांसाठी 'सकाळ'ने स्वतंत्र पुरवणी सुरू केली. या पुरवणीसाठी 'सकाळ'ने 'टुडे' हे इंग्रजी नाव वापरले. २००६-२००७ या कालावधीमध्ये 'सकाळ'च्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांमध्ये स्थानिक बातम्यांसाठी 'टुडे' पुरवणी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. या बदलाची सुरुवात 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीपासून झाली. 'पुणे टुडे' ही पहिली पुरवणी १४ ऑगस्ट, २००६ रोजी प्रसिद्ध झाली. रोज मुख्य अंकाबरोबर ही १० किंवा १२ पानी पुरवणी प्रसिद्ध होते. यामुळे स्थानिक पातळीवरील बातम्या आणि जाहिरातदार यांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले.

बाह्य दुवे[संपादन]