Jump to content

शंकर वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शंकर वैद्य
जन्म जून १५, १९२८
ओतूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू सप्टेंबर २३, २०१४
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य ,कवी , गीतकार
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, कथा
पत्नी सरोजिनी
अपत्ये निरंजन (पुत्र)

शंकर वैद्य ( ओतूर (पुणे जिल्हा), १५ जून १९२८ - मुंबई, २३ सप्टेंबर २०१४) हे मराठी साहित्यकार होते. ते समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही सर्वपरिचित होते.

ओतूर या जन्मगावातून निघून, जुन्नरसारख्या गावी माध्यमिक शिक्षण घेऊन शंकर वैद्य पुण्याला नोकरीसाठी स्थायिक झाले. आधी नागपूरच्या, नंतर पुण्याच्या आणि शेवटची वर्षे मुंबईच्या इस्माईल युसूफ महाविद्यालयांत ते मराठीचे अध्यापन करत राहिले.

वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. 'कालस्वर' हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर २७ वर्षांनी त्यांचा 'दर्शन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.

कवी कुसुमाग्रजांच्या निवडक कविता असलेल्या ’प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे, आणि कवी मनमोहन यांच्या कविता असलेल्या ’आदित्य’ या काव्यसंग्रहांचे संपादन शंकर वैद्य यांनी केले होते.

शंकर वैद्यांच्या पत्‍नी सरोजिनी वैद्य याही एक प्रतिभाशाली कवयित्री आणि चरित्र लेखिका होत्या.

शंकर वैद्य यांच्या गाजलेल्या कविता

[संपादन]
 • शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाळा.
 • स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला.
 • पालखीचे भोई 
 • आज हृदय मम
 • रिमझिम 
 • वाळवंटांतून भीषण

शंकर वैद्य यांची पुस्तके

[संपादन]
 • आला क्षण गेला क्षण (कथासंग्रह)
 • कालस्वर (कवितासंग्रह)
 • दर्शन (कवितासंग्रह)

शंकर वैद्य यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
 • कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
 • महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
 • मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार
 • वाग्विलासिनी पुरस्कार, वगैरे.

बाह्य दुवे

[संपादन]

आठवणीतली गाणीवरची शंकर वैद्यांची गीते

संदर्भ

[संपादन]
 • [१] 'मुग्ध, रसील्या कवितेचा धनी' लेख: लोकसत्ता ९ जून, २०१३