लक्ष्मीनारायण बोल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लक्ष्मीनारायण बोल्ली जन्म : १५ एप्रिल, इ.स. १९४४ - मृत्यू : २३ फेब्रुवारी, इ.स. २०१८[१]) हे एक मराठी लेखक, अनुवादक व संशोधक होते. यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन केले.

हे मूळचे आंध्रप्रदेशातील असून कापड व्यवसायाच्या निमित्ताने सोलापूर येथे आले स्थायिक झाले. त्यांचे एका साळीयाने हे आत्मचरित्र पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनने प्रसिद्ध केले.

लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • अभंग कलश (वाचनानुवाद)
 • एका पंडिताचे मृत्युपत्र
 • एका साळियाने (आत्मचत्र)
 • कमलपत्र
 • कृष्णदेवराय
 • गवताचे फूल (बालकवितासंग्रह)
 • गवाक्ष (ललित लेखसंग्रह) तेलुगू फुलांचा मराठी सुगंध
 • गीत मार्कंडेय (गीतसंग्रह)
 • झुंबर (काव्यसंग्रह)
 • कवितेचा आत्मस्वर दत्ता हलसगीकर (ललित चरित्र)
 • पंचपदी (काव्यानुवाद)
 • मैफल (काव्यसंग्रह)
 • यकृत (अनुवादित नाटक)
 • रात्र एका होडीतली
 • रात्रीचा सूर्य (खंड (?) काव्यानुवाद)
 • दक्षिण भाषेतील रामायणे (तौलनिक अभ्यास)
 • कविराय राम जोशी (कादंबरी)
 • लक्ष्मीनारायण बोल्लींच्या कविता (कवितासंग्रह)
 • विरहिनी वासवदत्ता (काव्यमय नाट्य)
 • संतकवी वेमन्ना
 • राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद)
 • छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू)
 • सावली (काव्यसंग्रह)
 • स्वरलय
 • ‘क्षण एक पुरे प्रेमाचा : राम गणेश गडकरी’ हे त्यांनी लिहिलेले ललित चरित्र पूर्णत्वास आले. त्याचे प्रकाशन होण्यापूर्वीच डॉ. बोल्ली यांनी जगाचा निरोप घेतला.[२]

पुरस्कार[संपादन]

 • ‘एका साळियाने’ या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला.
 • ‘कविराय राम जोशी’ या कादंबरीला दमाणी पुरस्कार मिळाला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे निधन -Maharashtra Times. Maharashtra Times. 13-03-2018 रोजी पाहिले. वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज सायंकाळी घरात लेखन करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ लोकसत्ता टीम. लक्ष्मीनारायण बोल्ली. Loksatta (Marathi भाषेत). 13-03-2018 रोजी पाहिले. तेलुगू ही मातृभाषा असूनही मायमराठीवरही तेवढेच प्रेम करणारे कवी व साहित्यिक लक्ष्मीनारायण बोल्ली भाषाभगिनींच्या एकात्मतेचे खरे प्रतीक होते. त्यांच्या निधनाने मराठी-तेलुगू भाषांना जोडणारा सेतू कोसळला आहे. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)