गुणाकर मुळे
गुणाकर मुळे ( (३ जानेवारी, इ.स. १९३५ - १६ ऑक्टोबर, इ.स. २००९) हे हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये वैज्ञानिक साहित्य लिहिणारे मराठी लेखक होते.
जीवन
[संपादन]महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या सिंधू बुजुर्ग गावी ३ जानेवारी, इ.स. १९३५ रोजी मुळ्यांचा जन्म झाला. मराठी भाषिक असूनही त्यांनी पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी भाषेत लेखन केले. त्यांची सुमारे ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते राहुल सांकृत्यायन यांचे शिष्य होते. त्यांनी हिंदीमध्ये सुमारे ३,००० लेख लिहिले आहेत[ संदर्भ हवा ] आणि इंग्लिश भाषेमध्ये २५०हून अधिक लेख लिहिले आहेत.
१६ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी मांसपेशीच्या एका दुर्लभ आजाराने त्यांचे नवी दिल्लीमध्ये निधन झाले[१].
प्रकाशित साहित्य
[संपादन]- ब्रह्माण्ड परिचय
- आकाश दर्शन
- अंतरिक्ष यात्रा
- नक्षत्रलोक
- सूर्य
- कम्प्यूटर क्या है?
- भारतीय अंकपद्धति की कहानी
- भारतीय विज्ञान की कहानी
- आपेक्षिकता सिद्धान्त क्या है?
- संसार के महान गणितज्ञ
- महान वैज्ञानिक
- केपलर
- अक्षरों की कहानी
- आंखों की कहानी
- गणित की पहेलियॉं
- ज्यामिति की कहानी
- लिपियों की कहानी
परिवार
[संपादन]दोन मुली, एक मुलगा आणि पत्नी असा त्याचा परिवार आहे.
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]मुळ्यांना हिंदी अकादमीचा साहित्यकार सन्मान, बिहार शासनाचा कर्पूरी ठाकुर स्मृति सन्मान, केंद्रीय हिंदी संस्थानाचा आत्माराम पुरस्कार, असे पुरस्कार लाभले आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "गुणाकर मुले का निधन (गुणाकर मुळे यांचे निधन)" (हिंदी भाषेत).[permanent dead link]
बाह्य दुवे
[संपादन]- प्रसिद्ध विज्ञान लेखक गुणाकर मुले नहीं रहे!
- महान वैज्ञानिक (गूगल पुस्तक; लेखक - गुणाकर मुळे)
- नक्षत्र लोक (गूगल पुस्तक; लेखक - गुणाकर मुळे)
- ज्यामिति की कहानी (गूगल पुस्तक; लेखक - गुणाकर मुळे)
- केपलर (गूगल पुस्तक; लेखक - गुणाकर मुळे)
- आकाश दर्शन (गूगल पुस्तक; लेखक - गुणाकर मुले)
- भारतीय अंकपद्धति की कहानी (गूगल पुस्तक; लेखक -गुणाकर मुळे)
- सूर्य (गूगल पुस्तक; लेखक - गुणाकर मुळे)