Jump to content

एकनाथ रानडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एकनाथ रामकृष्ण रानडे या पानावरून पुनर्निर्देशित)
एकनाथ रामकृष्ण रानडे
चित्र:Eknath R Ranade.jpg
जन्म १९ नोव्हेंबर १९१४
टिमटाळा, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू २२ ऑगस्ट १९८२(६७ वर्षे)
चेन्नई, तामिळनाडू
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण एम. ए. एल.एल.बी
प्रसिद्ध कामे कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारकाची उभारणी, 'विवेकानंद केंद्र' या संस्थेची स्थापना
ख्याती भारतीय सामाजिक व आध्यात्मिक चळवळ
धर्म हिंदू


एकनाथ रामकृष्ण रानडे (इंग्लिश: Eknath Ramkrishna Ranade) (१९ नोव्हेंबर, १९१४२२ ऑगस्ट, १९८२), ज्यांना एकनाथजीही म्हणत असत, हे भारतातील सामाजिक व आध्यात्मिक चळवळीतील एक खंदे कार्यकर्ते होते. ते आपल्या संघटनात्मक कार्यासाठी नावाजलेले होते.[] त्यांनी कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारकाची आणि विवेकानंद केंद्र या सामाजिक व आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली.[]

ते शालेय जीवनापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले होते. तेंव्हापासूनच ते संघासाठी महत्त्वाचे संघटक व मार्गदर्शक बनले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १९५६ ते १९६२ या काळात सचिवही होते. ते विवेकानंदांच्या विचारांनी भारल्या जाउन त्यांनी त्याविषयी एका पुस्तकाचे संकलनही केले.१९६३ ते १९७२ या काळात त्यांनी कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारकाची उभारणी केली.[][]

पूर्वीचे जीवन

[संपादन]

त्यांचा जन्म अमरावती जिल्हा टिमटाळा येथे झाला व १९२०नंतर त्यांचे पुढील शिक्षण महाल,नागपूर येथे झाले. त्यांनी १९३२ साली मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी तत्त्वज्ञान या विषयात एम. ए.ची डिग्री विशेष प्राविण्यासह संपादन केली. त्यांनी १९४५मध्ये जबलपूर येथील सागर विद्यापीठातून एल.एल.बी उत्तीर्ण केली.[]

चरित्रपर पुस्तक

[संपादन]

एकनाथजी रानडे - एक जीवन एक ध्येय, ले. सुरेखा दीक्षित, मोरया प्रकाशन, २०१६, प्रस्तावना - मा.गो.वैद्य

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c विवेकानंद २००९, पान. १६९.
  2. ^ "Eknathji Ranade | Vivekananda Kendra". www.vrmvk.org. 2020-11-19 रोजी पाहिले.
  3. ^ अडवानी २००८, पाने. १४२–१४४.