प्रतिभा पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रतिभा पाटील
प्रतिभा पाटील


कार्यकाळ
जुलै २५, इ.स. २००७ – जुलै २४, इ.स. २०१२[१]
पंतप्रधान मनमोहन सिंग
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
मागील डॉ. अब्दुल कलाम
पुढील प्रणव मुखर्जी

कार्यकाळ
८ नोव्हेंबर २००४ – २३ जुलै २००७
मागील मदनलाल खुराना
पुढील ए.आर. किडवाई

जन्म १९ डिसेंबर, १९३४ (1934-12-19) (वय: ८४)
नंदगाव, जळगाव, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती देवीसिंह राजसिंह पाटील

प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर जुलै २५, इ.स. २००७ रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.प्रतिभाताईंनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या, अशा त्या ठराविक राजकिय व्यक्तींपैकी आहेत. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ इतर राष्ट्रपतींच्या तुलनेने नित्कृष्ट दर्जाचा आणि स्वप्रेमासाठी कार्यरत असा कुप्रसिद्ध आहे. त्यांच्या समाजकार्यात प्रारंभी काळात त्यांनी गरीब व निराधार महिलांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे काढली होती ही त्यांची खूप जमेची बाजू आहे. तसेच त्यांच्या नावाने अनेक उत्तम विक्रम नोंदवले गेले आहेत,त्यापैकीच जगातील पहिली महिला राष्ट्रपती कि ज्यांनी 74 व्या वर्षी "सुखोई" सारखे लढाऊ विमान चालवले, व भारतीय महिला सैन्य शक्तीला ताकद देऊन जगाला भारतीय महिलेची ओळख दिली. त्या पहिल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत कि ज्यांनी त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळात मुंबई सारख्या आतंकवादी हल्ला झालेल्या ठिकाणी तात्काळ भेट दिली व शहिद झालेल्या कुटुंबाना घरी जाऊन भेटी दिल्या. त्यांच्याच राष्ट्रपती काळात त्यांच्या प्रयत्नाने भारताला "युनो" ची सदस्यता मिळाली.तसेच त्यांच्या पुढाकाराने भारतात "अन्टी रॅगिंग" कायदा अंमलात आला. त्या प्रथम भारतीय राष्ट्रपती आहेत कि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय आर्थिक संमेलनाचे आयोजन व अध्यक्ष पद भुषविले.मेट्रो रेल्वेने प्रवास करणारी प्रथम राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील.भारतातील पहिले आधार कार्ड ज्या व्यक्तीचे बनले त्या व्यक्ती म्हणजे माजी राष्ट्रपती डॉ.प्रतिभाताई पाटील. याचबरोबर राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात कुंटूंबियांसह जगभरात भ्रमंती करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या घरासाठी ज्याची कमाल मर्यादा २००० वर्ग फुट असते त्यात पाटील यांनी सैनिकांसाठी आरक्षित पुणे येथील २ लक्ष वर्ग फुट जागा घेतली, यावर टिका झाल्यानंतर मात्र त्या ६००० वर्ग फुटावर बंगला बांधत आहे.

राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.

जीवन[संपादन]

प्रतिभाताई देवीसिह पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. घरची श्रीमंती, व त्यांत पाच भावांत एकच लाडकी बहीण, त्यामुळे लहानपण लाडाकोडात गेले. एम.जे. कॉलेज, जळगाव येथून एम. ए.ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून येथून एल.एल.बी. ची परीक्षा देऊन त्या वकील झाल्या.[२].

इ.स. १९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यांची एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. ७ जुलै १९६५ ला त्यांनी लग्न करून अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला व पहिल्यांदाच मंत्री झाल्या. त्यानंतर पुढे सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्यांच्या मंत्री होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कामकाज, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारुबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड वगैरे. १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

इ.स. १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. १९८९मध्ये त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ ला एदलाबाद मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.

नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.

त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बँकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले.


स्वीकारलेली पदे[संपादन]

 • १९६२ पासून महाराष्ट्राच्या आमदार
 • १९६७ ते ७२ : आरोग्य, पर्यटन, गृहनिर्माण, संसदीय कामकाज या खात्यांच्या राज्यमंत्री
 • १९७२ ते ७४ : समाजकल्याण मंत्री
 • १९७४ ते ७५ : आरोग्य आणि समाजकल्याण मंत्री
 • १९७५ ते ७८ : शिक्षण, सांस्कृतिक, पुनर्वसन मंत्री
 • १९७९ ते फेबुवारी १९८० : विधानसभेत विरोधी पक्षनेत्या
 • १९८२ ते ८५ : शहरविकास आणि गृहनिर्माण मंत्री
 • १९८३ ते ८५ : नागरी पुरवठा आणि समाजकल्याण मंत्री
 • १९८५ ते ९० : राज्यसभेवर निवड
 • १९८८ ते ९० : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष
 • १८ नोव्हेंबर १९८६ ते ५ नोव्हंेबर १९८८ : राज्यसभेच्या उपसभापती
 • १९९१ : लोकसभेच्या खासदार
 • ८ नोव्हेंबर २००४ : राजस्थानच्या राज्यपाल

कौटुंबिक पार्श्वभूमी[संपादन]

१९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह. एक मुलगा आणि एक मुलगी. प्रतिभा पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता.

प्रतिभाताई पाटील या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत की ज्यांनी एकही निवडणूक हरली नाही. तसेच त्या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत कि ज्यांनी आपल्या राष्ट्रपती कार्यकाळात एक सुखोई सारखे लढाऊ विमान चालवले, ते पण वयाच्या 74 व्या वर्षी. जगातील एकमेव महिला राष्ट्रपती ज्यांनी आपल्या देशाची संस्कृती जपत कुठल्याही प्रकारे राजशिष्टाचार तोडला नाही, एवढ्या त्या आपल्या भारत देशाच्या संस्कृतीचा आदर करत होत्या व करतात.

दयाळू प्रतिभा पाटील[संपादन]

प्रतिभा पाटील यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत अनेक निर्घृण गुन्हेगारांचे गुन्हे माफ केले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू' राष्ट्रपती ठरल्या. त्यांनी २३ जणांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. आधीच्या ३० वर्षांत म्हणजे १९८१ पासून मंजूर करण्यात आलेल्या दयेच्या अर्जांच्या तुलनेत हे प्रमाण ९० टक्के होते. त्यांनी महिलांसाठी अनेक उत्तम कामे केली.त्यांच्याच काळात अन्टी रँगिग हा कायदा अंमलात आला, व देशातील अत्याचार कमी झाले.

प्रतिभा पाटील यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

पाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकांचे प्रत्येकी ६ खंड, ’जब मैं राष्ट्रपति थीं’ (२ खंड) आणि ’स्त्री उत्कर्ष की ओर’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी-मराठी-इंग्रजीतील भाषणे व अन् व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.

प्रतिभा पाटील यांच्यावर लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • प्रतिभा पाटील : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती (प्राची गोंधळेकर)
 • भारताची प्रतिभा (संपादित आठवणीसंग्रह) (प्रकाशन दिनांक ३०-१२-२०१७) झाले.
 • भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील (डाॅ. नीला पांढरे)
 • भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील (पंकजकुमार)
 • राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील : वैयक्तिक व राजकीय जीवनप्रवासाचा मागोवा (डाॅ. छाया महाजन)

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी मजकूर). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. 
 2. ^ Biographical Sketch Member of Parliament X Lok Sabha


बाह्य दुवे[संपादन]


मागील:
अब्दुल कलाम
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. २००७
पुढील:
प्रणव मुखर्जी