भीमराव पांचाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भीमराव पांचाळे

भीमराव पांचाळे (३० मार्च, जन्मवर्ष अज्ञात - हयात) हे मराठी गजलगायक आहेत. मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळा आयोजित करत असतात. यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यातील आष्टगाव येथे झाला.

जीवन[संपादन]

अमरावतीचे भय्यासाहेब देशपांडे आणि अकोल्याचे एकनाथपंत कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी नऊ वर्षं शास्त्रीय गायनाचे शिक्षण त्यांनी घेतले. वाणिज्य शाखा आणि मराठी-हिंदी भाषा साहित्य तसेच संगीत यांतील पदवी अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. सुरेश भटांचे गजल अभियान उत्तरोत्तर दृढ करण्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा मोठा वाटा आहे. मान्यवर शास्त्रीय गायनाच्या उस्तादांकडून परिपूर्ण शिक्षण घेऊनही भीमरावांनी मराठी गजल गायनाचे व्रत घेतले. त्यांनी 'गजल सागर' ही संस्था स्थापन केली. त्याद्वारे गजल कार्यशाळा, ग्रंथ प्रकाशन असे स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.

कार्य[संपादन]

भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. भीमरावांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. त्यांनी नाटके, चित्रवाणीवरील चित्रपट व मालिका तसेच बोलपट यांना संगीत दिले आहे.

भीमराव पांचाळे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • कॅसेट शब्द सुरांची भावयात्रा
  • ग़ज़लियात

बाह्य दुवे[संपादन]