असंभव (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
असंभव
दिग्दर्शक सतीश राजवाडे
निर्माता पल्लवी जोशी
कलाकार मानसी साळवी, ऊर्मिला कानेटकर, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनील बर्वे, आनंद अभ्यंकर, सुहास भालेकर, अशोक शिंदे, मधुराणी प्रभुलकर
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ७७४
निर्मिती माहिती
कथा संकलन चिन्मय मांडलेकर
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ०८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १२ फेब्रुवारी २००७ – २९ ऑगस्ट २००९ [१]
अधिक माहिती
आधी कुलवधू
नंतर कळत नकळत

असंभव ही झी मराठी वाहिनीवरुन प्रसारित झालेली मराठी मालिका आहे. सतीश राजवाडे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून चिन्मय मांडलेकर याने या मालिकेचे लेखन केले. मानसी साळवी, ऊर्मिला कानेटकर, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनील बर्वे, आनंद अभ्यंकर, सुहास भालेकर, अशोक शिंदे, मधुराणी प्रभुलकर, इत्यादी कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

प्रसारण[संपादन]

१२ फेब्रुवारी २००७ रोजी असंभव मालिकेचा पहिला भाग झी मराठी वरुन प्रसारित झाला. ही मालिका प्रारंभी सोमवार ते शुक्रवार रात्री ०८:३० वाजता प्रसारित होई. परंतु ०१ जुलै २००७ पासून मालिका सोमवार ते शनिवार प्रसारित होण्यास सुरुवात झाली. २९ ऑगस्ट २००९ रोजी या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित झाला.

पात्रयोजना[संपादन]

पात्राचे नाव कलाकार नाते/टिप्पणी
शुभ्रा शास्त्री
पूर्वजन्मात पार्वती शास्त्री.
मानसी साळवी
ऊर्मिला कानेटकर
शुभ्रा ही आदिनाथ शास्त्री याची पत्नी; तर पूर्वजन्मात हीच पार्वती शास्त्री या नावाने महादेव शास्त्री याची पत्नी असते.
मानसी साळवी आधीच्या काही भागांत या व्यक्तिरेखा रंगवत होती. त्यानंतर मालिका संपेपर्यंत ऊर्मिला कानेटकर हिने या भूमिका रंगवल्या.
आदिनाथ शास्त्री
पूर्वजन्मात महादेव शास्त्री.
उमेश कामत आदिनाथ शास्त्री हा शुभ्रा हिचा पती; तर पूर्वजन्मात हाच महादेव शास्त्री या नावाने पार्वती शास्त्री हिचा पती असतो.
डॉ. विराज सामंत
पूर्वजन्मात श्रीरंग रानडे
सुनील बर्वे
सुलेखा
पूर्वजन्मात इंदुमती
नीलम शिर्के प्रमुख खलनायिकेची व्यक्तिरेखा.
भालचंद्र
पूर्व जन्मात बल्लाळ
अशोक शिंदे
दीनानाथ शास्त्री आनंद अभ्यंकर
सोपान काका सुहास भालेकर
अभिमान सरंजामे चिन्मय मांडलेकर
इन्स्पेक्टर विक्रांत भोसले सतीश राजवाडे

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'असंभव'चा लवकरच निरोप". १० मार्च २०१३ रोजी पाहिले.