श्रीयुत गंगाधर टिपरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
श्रीयुत गंगाधर टिपरे
दिग्दर्शक केदार शिंदे
कलाकार दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम, रेश्मा नाईक
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १६५ [१]
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग २ नोव्हेंबर, इ.स. २००१ [२]
प्रथम प्रसारण २ नोव्हेंबर, इ.स. २००१ – ७ जानेवारी, इ.स. २००५ [१]

श्रीयुत गंगाधर टिपरे ही झी मराठी वाहिनीवरून इ.स. २००१-२००५ या काळात प्रसारित झालेली मराठी मालिका आहे. २ नोव्हेंबर, इ.स. २००१पासून हिच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली [२]. १६५ भागांनंतर [१] ७ जानेवारी, इ.स. २००५ रोजी अखेरचा भाग प्रक्षेपित होऊन ही मालिका संपली [१]. केदार शिंदे याने या मालिकेचे दिग्दर्शन केले असून दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम, रेश्मा नाईक इत्यादी कलाकारांनी या मालिकेत भूमिका केल्या आहेत.

कथानक[संपादन]

या मालिकेचे कथानक दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या लोकसत्ता दैनिकात प्रसिद्ध होणार्‍या सदरांवर आधरित होते. टिपरे कुटुंबात घडणार्‍या दैनंदिन घटना या ह्या मालिकेचा आधार होता. पुढे ह्या सदरांचे ‘अनुदिनी’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

पात्रयोजना[संपादन]

पात्राचे नाव कलाकार नाते/टिप्पणी
गंगाधर टिपरे ऊर्फ "आबा" दिलीप प्रभावळकर टिपरे कुटुंबातील आजोबा.
शेखर टिपरे राजन भिसे गंगाधर टिपर्‍यांचा पुत्र
शामला टिपरे शुभांगी गोखले शेखर टिपरे याची पत्नी
श्रीलेश उर्फ शिर्‍या टिपरे विकास कदम शेखर टिपरे याचा पुत्र
शलाका टिपरे रेश्मा नाईक शेखर टिपरे याची कन्या

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. a b c d भंडारी, अमित (७ डिसेंबर, इ.स. २००४). "टिपरे फॅमिलीचा रामराम घ्यावा" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १३ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). १२ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 
  2. a b शिंदे,केदार (६ जानेवारी, इ.स. २००६). "'टिपरे' का...बंद केली ?" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १३ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). १२ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.