"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २५: | ओळ २५: | ||
==अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5608311297246991157|शीर्षक=बुकगंगा|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>== |
==अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5608311297246991157|शीर्षक=बुकगंगा|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>== |
||
* अर्थात (अर्थशास्त्रविषयक पुस्तक) |
* अर्थात (अर्थशास्त्रविषयक पुस्तक) |
||
* अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर? (अर्थशास्त्रविषयक पुस्तक) |
|||
* जीनिअस [[अलेक्झांडर फ्लेमिंग]] (सहलेखिका - दीपा देशमुख) |
* जीनिअस [[अलेक्झांडर फ्लेमिंग]] (सहलेखिका - दीपा देशमुख) |
||
* जीनिअस [[ॲल्बर्ट आइन्स्टाइन|अल्बर्ट आईनस्टाईन]] (सहलेखिका - दीपा देशमुख) |
* जीनिअस [[ॲल्बर्ट आइन्स्टाइन|अल्बर्ट आईनस्टाईन]] (सहलेखिका - दीपा देशमुख) |
११:३८, ३१ मे २०१९ ची आवृत्ती
अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.
बालपण
अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रामुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असतानाच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्रावीण्य मिळवले.
शैक्षणिक अर्हता
- दहावीच्या परीक्षेत सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण .
- पहिली ते आय.आय.टीच्या जवळजवळ सर्व परीक्षांत त्यांनी गणितात सर्वोच्च गुण पारितोषिके मिळवली.
- भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधून १९७२ साली उत्तीर्ण झालेले (आयआयटीचे) केमिकल इंजिनिअर आहेत.
कारकीर्द
अच्युत गोडबोले यांनी एकेकाळी संगणक आणि त्याचं तंत्रज्ञान समजायला जड जात आहे; म्हणून चक्क ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे त्यांनीच संगणकाशी संबंधित असलेल्या अनेक जगद्विख्यात कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार म्हणून पदे सांभाळली; अमेरिकेतल्या "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘च्या ५०व्या मजल्यावर कार्यालय स्थापून कंपन्यांच्या वतीने काही कोटींचे करार-मदार केले आणि संगणक या विषयावर ७००-८०० पृष्ठांचे चार चार ग्रंथही लिहिले. वर्षाला दोन कोटी रुपये पगाराची नोकरी नाकारून अच्युत गोडबोले यांनी केवळ लेखनालाच वाहूनही घेण्यासाठी संगीत, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, , मानसशास्त्र , या विषयात लिखाणाला सुरुवात केली.
व्यावसायिक कारकीर्द
- सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिका येथील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत ३२ वर्षांचा अनुभव आणि कामानिमित्त जगभरात १६० वेळा प्रवास.
- पटणी, सिंटेल, एल ॲन्ड टी इन्फोटेक, अपार, दिशा, वगैरे अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असताना त्यांच्या जगभरच्या अनेक पट वाढीसाठी सक्रिय हातभार.
- सॉफ्टएक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे . टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी संगणकावरची ‘ऒपरेटिंग सिस्टिम्स’, डेटा कम्युनिकेशन्स ॲन्ड नेटवर्क्स’, ‘वेब टेक्नॉलॉजीज’ आणि डीमिस्टिफाईंग कम्प्युटर्स’ या प्रत्येकी ५००-७०० पानी चार पाठ्यपुस्तकांचे लेखन. या पुस्तकांचे चिनीसकट जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत.
समाजसेवा
चमकदार व्यावसयिक कारकिर्दीनंतर निवृत्तीपश्चात गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. [ संदर्भ हवा ] भिल्ल आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली, आणि दहा दिवसांची कैद भोगली. [१]. ‘आशियाना’ नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा सुरू करण्यात अच्युत गोडबोले यांचा पुढाकार होता.
अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके [१]
- अर्थात (अर्थशास्त्रविषयक पुस्तक)
- अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर? (अर्थशास्त्रविषयक पुस्तक)
- जीनिअस अलेक्झांडर फ्लेमिंग (सहलेखिका - दीपा देशमुख)
- जीनिअस अल्बर्ट आईनस्टाईन (सहलेखिका - दीपा देशमुख)
- Operating Systems (सहलेखक - अतुल कहाते)
- जीनिअस आयझॅक न्यूटन (सहलेखिका - दीपा देशमुख)
- जीनिअस एडवर्ड जेन्नर (सहलेखिका - दीपा देशमुख)
- कॅनव्हास (कलाकौशल्यविषयक पुस्तक, सहलेखिका - दीपा देशमुख)
- किमयागार (विज्ञानविषयक)
- गणिती (गणिताची आवड निर्माण करणारी एक रसीली सफर; सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई)
- ग्रेट भेट
- जीनिअस गॅलिलिओ गॅलिली (सहलेखिका - दीपा देशमुख)
- गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा (सहलेखक - अतुल कहाते)
- झपूर्झा - भाग १, २, ३ (प्रसिद्ध इंग्रजी लेखकांचे साहित्य आणि त्याची समीक्षा, सहलेखिका - नीलांबरी जोशी)
- जग बदलणारे १२ जीनिअस (पुस्तकसंच, सहलेखिका - दीपा देशमुख)
- Data Communications And Networks (सहलेखक - अतुल कहाते)
- Demystifying Computers
- थैमान चंगळवादाचे (वैचरिक)
- नॅनोदय (नॅनोटेक्नॉलॉजीविषक, सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई)
- नादवेध (संगीतविषक, सहलेखिका - सुलभा पिशवीकर)
- बखर संगणकाची (सहलेखक - अतुल कहाते)
- बोर्डरूम (सहलेखक - अतुल कहाते)
- मनकल्लोळ भाग १ व २ (सहलेखिका नीलांबरी जोशी)
- मनात (मानसशास्त्रविषयक)
- मुसाफिर (आत्मकथन)
- जीनिअस मेरी क्युरी (सहलेखिका - दीपा देशमुख)
- जीनिअस जे. रॉबर्ट ओपेनहायमर (सहलेखिका - दीपा देशमुख)
- जीनिअस रॉबर्ट कॉख (सहलेखिका - दीपा देशमुख)
- जीनिअस रिचर्ड फाईनमन (सहलेखिका - दीपा देशमुख)
- रक्त (सहलेखिका - डॉ. वैदेही लिमये)
- लाईम लाईट (सहलेखिका नीलांबरी जोशी) : विदेशी चित्रपटसृष्टीची अनोखी यात्रा
- जीनिअस लीझ माइट्नर (सहलेखिका - दीपा देशमुख)
- जीनिअस लुई पाश्चर (सहलेखिका - दीपा देशमुख)
- Web Technologies (सहलेखक - अतुल कहाते) या पुस्तकाच्या अनेक सुधारित आवृत्त्या निघत असतात.
- संगणक- युग (माहितीपर)
- संवाद
- जीनिअस स्टीफन हाॅकिंग (सहलेखिका - दीपा देशमुख)
- स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ (सहलेखक - अतुल कहाते)
अच्युत गोडबोले यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- त्यांच्या ‘मनकल्लोळ भाग १ व २ (सहलेखिका नीलांबरी जोशी)’ या पुस्तकाला मसापचा पुरस्कार (२६-५-२०१७)
- ‘नादवेध’, ‘किमयागार’, ‘अर्थात’, नॅनोदय’ आणि ‘मनात’ या पुस्तकांना राजशासनासह अनेक मानाचे पुरस्कार.
- आय.बी.एम.तर्फे दोनद, भारतच्या पंतप्रधानांकडून दोनदा पुरस्कार.
- उद्योगरत्न पुरस्कार
- आयाअयटीची प्रचंड मानाचा ‘डिस्टिंग्विश्ड ॲल्युमिनस’ पुरस्कार
- भीमसेन जोशी यांच्या हस्ते कुमार गंधर्व पुरस्कार.
- अनेक मान्यवर संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार
- TED या प्रचंड प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय भाषणमालिकेत भाषण देण्याचा बहुमान
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘युवा साहित्य-नाट्य संमेलना’चे अध्यक्षपद
- वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळात आणि बहुरंगी बहर[२] [३] [४] यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
बाह्य दुवे
- अच्युत गोडबोले यांचे संकेतस्थळ - सध्या बंद आहे.
संदर्भ
[२].
संदर्भ
- ^ https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5608311297246991157. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Wayam Magazine (2018-04-16), https://www.youtube.com/watch?v=xFp0LQDdQso&t=1083s, 2018-07-06 रोजी पाहिले Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Wayam Magazine (2018-04-17), https://www.youtube.com/watch?v=1CkTQc-DSTM, 2018-07-06 रोजी पाहिले Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Wayam Magazine (2018-04-17), https://www.youtube.com/watch?v=6M5LvpAsasI, 2018-07-06 रोजी पाहिले Missing or empty
|title=
(सहाय्य)