रिचर्ड फाइनमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिचर्ड फाइनमन
Richard Feynman ID badge.png
पूर्ण नाव रिचर्ड फिलिप्स फाइनमन
जन्म मे ११, १९१८
क्वीन्स, न्यूयॉर्क, अमेरिका
मृत्यू फेब्रुवारी १५, १९८८
लॉस एंजिलिस, कॅलिफोर्निया, अमेरिका
निवासस्थान अमेरिका Flag of the United States.svg
राष्ट्रीयत्व अमेरिकन Flag of the United States.svg
धर्म नास्तिक
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
कार्यसंस्था मॅनहटन प्रकल्प,
कॉर्नेल विद्यापीठ,
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
प्रशिक्षण मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,
प्रिन्स्टन विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक जॉन आर्चिबाल्ड व्हिलर
डॉक्टरेटकरता विद्यार्थी अल्बर्ट हिब्ज,
जॉर्ज त्स्वाइग
ख्याती क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स,
पार्टिकल थिअरी,
फाइनमन डायग्रॅम्स
पुरस्कार नोबेल पारितोषिक Nobel prize medal.svg (१९६५)

रिचर्ड फिलिप्स फाइनमन (मे ११, इ.स. १९१८ - फेब्रुवारी १५, इ.स. १९८८) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते.

त्यांच्या क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्समधल्या संशोधनासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी "पाथ इंटिग्रल्स" व "फाइनमन डायग्राम" इत्यादी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा विकास केला.

जीवन[संपादन]

सुरुवातीचा काळ[संपादन]

फाइनमन यांनी बॉस्टन येथील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(MIT) येथे बी.एस. तर प्रिन्सटन विद्यापीठात पीएच.डी. पूर्ण केले. लोस एलॅमोस येथे जगातील पहिला अणुबाँब बनविणार्‍या मॅन्हॅटन प्रकल्पामध्ये त्यांचा सहभाग होता.

१९६१-६२ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथे फाइनमन यांनी नवीन विद्यार्थ्यांना दिलेली भौतिकशास्त्राची व्याख्याने, व त्यावर आधारित ग्रंथमाला गाजली, व फाइनमन यांची गणना जगातल्या सर्वोत्तम भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकात होउ लागली..

१९६५ साली रिचर्ड फाइनमन, जुलियन श्विंगरसिन-इतिरो तोमोनागा यांना क्वांटम फील्ड थिअरीमधील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले.

प्रकाशित ग्रंथ[संपादन]

  • आर. पी. फाइनमन, जे. हिब्स, पाथ इंटिग्रल्स अँड क्वांटम फील्ड थियरी
  • आर. पी. फाइनमन, आर. लेटन, शुअरली यू आर जोकिंग मि. फाइनमन! (आत्मचरित्र)
  • आर. पी. फाइनमन, द मीनिंग ऑफ इट ऑल
  • द कॅरॅक्टर ऑफ फिजिकल लॉ (तत्वज्ञान)
  • आर. पी. फाइनमन, आर. लेटन, व्हॉट डू यू केअर व्हॉट अदर पीपल थिंक? (आत्मचरित्र)
  • आर. पी. फाइनमन, आर. लेटन, एम. सँड्स्, द फाइनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स

बाह्यदुवे[संपादन]