मेरी क्युरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मेरी क्युरी
Curie-nobel-portrait-2-600.jpg
मेरी क्युरी हिचे इ.स. १९११ मधील नोबेल पारितोषिकावेळचे प्रकाशचित्र
पूर्ण नावमारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी
जन्म नोव्हेंबर ७, इ.स. १८६७
वॉर्सा, पोलंड
मृत्यू जुलै ४, इ.स. १९३४
सॉंसेलमोत्स, फ्रान्स
निवासस्थान पोलिश Flag of Poland.svg
फ्रेंच Flag of France.svg
धर्म नास्तिक
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र
कार्यसंस्था सोर्बोन
प्रशिक्षण सोर्बोन
ईएसपीसीआय
डॉक्टरेटचे मार्गदर्शक ऑन्‍री बेकेरेल
डॉक्टरेटकरता विद्यार्थी आंद्रे-लुई डेबिएर्न
मार्गरीटा पेरे
ख्याती किरणोत्सर्ग
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९०३)
Nobel prize medal.svg रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९११)
पती पिएर क्युरी
अपत्ये इरेन जुलिओ-क्युरी, एवा क्युरी

मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो.

जन्म व बालपण[संपादन]

मेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एका अत्यंत अशा गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मुळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वाल्दिस्लाव असे होते. ते गणितविज्ञान या विषयांचे शिक्षक होते. मेरी क्युरी यांच्या आईचे नाव, ब्रोनिस्लावा असे होते. त्या शिक्षिका व उत्तम पियानोवादक होत्या. मेरी क्युरी यांना जोसेफ, जोफिया, हेलेना, ब्रोनिस्लावा ही भावंड होती. मेरी क्युरी यांच्या आईंना क्षयरोग झाला होता. त्यामुळे मेरी क्युरी यांना त्यांची साथ फार काळ लाभली नाही. ९ मे १८७८ साली मेरी क्युरी यांच्या आईचा मृत्यू झाला.

विवाह[संपादन]

२६ जुलै इ.स. १८९५ साली त्यांचा विवाह पिएर क्युरी या संशोधकाशी झाला.

संशोधन व कार्य[संपादन]

वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करून एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरून पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.

मृत्यू[संपादन]

मेरी क्युरी यांचा मृत्यू ४ जुलै १९३४ या दिवशी रेडिएशनमुळे झालेल्या ल्युकेमियाने झाला.

मेरी क्युरी यांची चरित्रे[संपादन]

पुरस्कार[संपादन]

नोबेल पारितोषिक पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पहिला मानही त्यांनी मिळवला.

बाह्यदुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.