एडवर्ड जेनर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एडवर्ड जेन्नर
Edward Jenner2.jpg
एडवर्ड जेन्नर
जन्म मे १७ , १७४९
बर्कली, ग्लुसस्टरशायर
वडील स्टीफन

एडवर्ड जेन्नर हे ब्रिटीश शास्त्रज्ञ होते. यांनी देवी रोगावर संशोधन केले आणि लसीचा शोध लावला.

बालपण[संपादन]

ग्लुसस्टरशायर मधल्या बर्कली नावाच्या एका छोट्याशा गावात एडवर्ड यांचा जन्म १७ मे १७४९ रोजी झाला.एडवर्ड यांच्या वडिलांचे नाव स्टीफन जेन्नर हे होते.ते धर्मोपदेशक होते. बर्कलीजवळ त्यांच्या मालकीची बरीचशी जमीन होती.एडवर्ड मिळून एकूण आठ भावंड होती. एडवर्ड सर्वात लहान होते. आठ मधील पुढे सहा भावंडे जिवंत राहिली. एडवर्ड पाच वर्षांचे असतानाच त्याची आई वारली. पुढे दोन महिन्यांनी वडीलही वारले. पुढे त्यांचा सांभाळ त्याच्या दोन मोठ्या भावांनी व तीन बहिणींनी केला.त्यांचा एक भाऊ स्टीफन वडिलांसारखा धर्मोपदेशक झाला.या वयातच एडवर्ड यांना वनस्पतीप्राणी यांचे अवशेष शोधण्याचा छंद जडला होता.

शिक्षण[संपादन]

एडवर्ड आठ वर्षांचा असताना त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केले.बोर्डिंग स्कूलमध्ये घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांना घेतले जात असे म्हणूनच अनाथ झालेल्या जेन्नर भावंडांनी हा निर्णय घेतला होता. काही कारणांमुळे एडवर्डला त्याच्या भावंडांनी तेथून काढून एका लहान खासगी शाळेत घातले.तेथे त्याने ग्रीक, लॅटिन यांबरोबरच धार्मिक शिक्षणही घेतले. सर्जनचा सहाय्यक होण्यासाठी जेवढे हवे तेवढे शिक्षण एडवर्ड यांचे झाले होते. त्यानंतर एडवर्ड यांनी डॉ.डेनियल लुडलव्ह यांच्या हाताखाली वयाच्या १४ व्या वर्षी सात वर्षे काम केले.

कार्य[संपादन]

डॉक्टर जेन्नर यांच्या पद्धतशीर प्रयत्नांनी लसीकरणाची नवीन पद्धत अमलात आली. आधुनिक वैद्यकीय इतिहासात इ.स. १८०२ साली ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेन्नरने देवीच्या लसीचा शोध लावून त्याचा यशस्वी वापर केल्यामुळे तिथून देवी रोगाच्या निर्मूलनाच्या लढय़ाची सुरुवात मानतात.

संदर्भ[संपादन]

  • जीनिअस एडवर्ड जेन्नर -लेखक अच्युत गोडबोले, दीपा देशमुख (मनोविकास प्रकाशन २०१५)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.