नीलांबरी जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


नीलांबरी जोशी या एक मराठी संगणकतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. बी.एस्‌सी. झालेल्या नीलांबरी यांच्याकडे ओरॅकल या संगणकीय भाषेचे सखोल ज्ञान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची १५हून अधिक वर्षांची कारकीर्द आहे. कुवेतमध्ये किंवा अमेरिकेत वास्तव्य असणार्‍या नीलांबरी जोशी ‘शारदा ग्रुप’च्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत.

लेखन[संपादन]

  • अंतर्नाद, अक्षर, मेनका, समाजस्वास्थ्य या मासिकांतून आणि दिव्य मराठी, पुढारी, सकाळ आणि लोकसत्ता या वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन
  • अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्‌स संस्थानामधील सडबरी व्हॅली स्कूलच्या अभ्यासक्रमातील ‘फ्री ॲट लास्ट’ या ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशनविषयक पुस्तकाचा अनुवाद
  • अरविंद गुप्ता यांच्या http://www.arvindguptatoys.com/ या पुस्तकांच्या वेबसाईटसाठी ‘ॲनाटोल ॲन्ड द कॅट’, ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’, ‘थ्री डेज टु सी’, नॉन-व्हॉयलन्ट वे ऑफ अप्‌ब्रिंगिंग’, फायर ऑफ हिरोशिमा’ ‘रॅट्स’, ‘वेब ऑफ लाईफ’, ‘हंप ऑन द नंदीज बॅक’, अशा काही पुस्तकांचा अनुवाद
  • ‘झपूर्झा भाग १, २, ३’ या विदेशी साहित्यिकांवरच्या पुस्तकांचे अच्युत गोडबोले यांच्याबरोबर सहलेखन
  • मनकल्लोळ भाग १ व २ (अच्युत गोडबोले यांच्याबरोबर सहलेखन)
  • ‘लाईमलाईट : विदेशी चित्रपटसृष्टीची अनोखी यात्रा...!’ या पुस्तकाचे अच्युत गोडबोले यांच्याबरोबर सहलेखन.
  • ‘हँड्स ऑन’, ‘चला करू या’, या विज्ञान प्रयोगांविषयक पुस्तकांचा अनुवाद

पुरस्कार[संपादन]

  • ‘मनकल्लोळ भाग १ व २’ या पुस्तकाला मसापचा पुरस्कार (२६-५-२०१७)


(अपूर्ण)