कुमारगंधर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुमार गंधर्व या पानावरून पुनर्निर्देशित)
शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ
Rajan, TN Krishnan and Kumar Gandharva.jpg
राजन, टी एन कृष्णन व कुमार गंधर्व.(गंधर्व- सगळ्यात उजवीकडे)
उपाख्य कुमारगंधर्व
आयुष्य
जन्म एप्रिल ८, इ.स. १९२४
मृत्यू जानेवारी १२, इ.स. १९९२
पारिवारिक माहिती
वडील सिद्धरामय्या कोमकलीमठ
जोडीदार भानुमती,
वसुंधरा कोमकली
संगीत साधना
गुरू बी.आर. देवधर
गायन प्रकार हिंदुस्तानी गायन
नाट्यसंगीत
निर्गुणी भजने

शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ (कन्नड: ಶಿವಪುತ್ರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕೋಮಕಾಳಿಮಠ್ ;) ऊर्फ कुमारगंधर्व (जन्म : एप्रिल ८, इ.स. १९२४ - देवास (भारत), जानेवारी १२, इ.स. १९९२; ) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


एक सर्जनशील संगीतकार व समर्थ गायक, सुळेभावी, जि. बेळगाव येथे जन्म. मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकाळी. ‘कुमार गंधर्व’ ही पदवी गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी दिली. वडीलही गायक. जन्मापासून रुजत असलेल्या संस्कारांमुळे वयाच्या सहाव्या वर्षी एकदम गाऊच लागले. १९३६ सालच्या हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी लोकप्रिय झालेली, स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.

अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. १९३६ पासून अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण. १९४७ साली विवाह.नंतर क्षयाचा आजार आणि तेव्हापासून मध्य प्रदेशात देवासला वास्तव्य. 

कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास  हा नव्या–जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांच्या सर्जनतेची साक्ष देतात. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असते.

त्यांचा पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत.

कुमार गंधर्व यांच्यासंबंधी आणि त्यांच्या गायकीसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]