"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १२८: | ओळ १२८: | ||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
==ह.ना. आपटे यांच्यासंबंधीची पुस्तके== |
|||
⚫ | |||
* सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर, [[सु. रा. चुनेकर]]) |
|||
* हरि नारायण आपटे (चरित्र, लेखक [[रा.भि. जोशी]]) |
* हरि नारायण आपटे (चरित्र, लेखक [[रा.भि. जोशी]]) |
||
⚫ | |||
⚫ | |||
* हरि नारायण आपटे, चरित्र व वाङ्मयविवेचन (इ.स. १९३१) : लेखिका वेणूताई पानसे |
* हरि नारायण आपटे, चरित्र व वाङ्मयविवेचन (इ.स. १९३१) : लेखिका वेणूताई पानसे |
||
⚫ | |||
⚫ | |||
* ह.ना. आपटे कांहीं आठवणी आणि मनोरंजक प्रसंग ([[बापुजी मार्तंड आंबेकर]]) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
१५:३३, १ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
हरी नारायण आपटे |
---|
हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.
प्रकाशित साहित्य
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबर्या लिहिणार्या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. धूर्तविलसत, मारून मुटकून वैद्यबुवा व जबरीचा विवाह ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, जयध्वज (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), श्रुतकीर्तचरित (कॉग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राइड’) व सुमतिविजय (शेक्सपियरचे ’मेझर फॉर मेझर’) ही रूपांतरित नाटके आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबऱ्यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. बिचारा या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती.
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
आजच | सामाजिक कादंबरी (अपूर्ण) | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १९०४ - इ.स. १९०६ |
उष:काल | ऐतिहासिक कादंबरी | इ.स. १८९५ - इ.स. १८९७ | |
घटकाभर करमणूक | कथासंग्रह | इ.स. १९१७ | |
कर्मयोग | सामाजिक कादंबरी(अपूर्ण) | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १९१३ - इ.स. १९१७ |
कालकूट | ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण) | इ.स. १९०९ - इ.स. १९११ | |
केवळ स्वराज्यासाठी | ऐतिहासिक कादंबरी | इ.स. १८९८ - इ.स. १८९९ | |
गड आला पण सिंह गेला | ऐतिहासिक कादंबरी | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १९०३ - इ.स. १९०४ |
गणपतराव | सामाजिक कादंबरी(अपूर्ण) | आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशन | इ.स. १८८६ - इ.स. १८९२ |
गीतांजली | टागोरांचे चरित्र व त्यांच्या गीतांजलीचा गद्य अनुवाद | इ.स. १९१७ | |
चंद्रगुप्त | ऐतिहासिक कादंबरी | इ.स. १९०२ - इ.स. १९०५ | |
चाणाक्षपणाचा कळस | सामाजिक कादंबरी | आधी मनोरंजन मासिक, नंतर रम्यकथा प्रकाशन | इ.स. १८८६ - इ.स. १८९२ |
जग हें असें आहे... | सामाजिक कादंबरी | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १८९७ - इ.स. १८९९ |
जबरीचा विवाह | प्रहसन(रूपांतरित) | मूळ लेखक - मोलियर | इ.स. १९१० |
जयध्वज | नाटक(रूपांतरित) | मूळ - व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी' | |
तारा | सामाजिक कादंबरी(अनुवादित) | ||
धूर्त विलसत | प्रहसन (रूपांतरित) | मूळ लेखक - मोलियर | इ.स. १९१० |
पण लक्षात कोण घेतो? | सामाजिक कादंबरी | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १८९० - इ.स. १८९२ |
पांडुरंग हरी | सामाजिक कादंबरी (अनुवादित) | ||
भयंकर दिव्य | कादंबरी | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १९०१ - इ.स. १९०३ |
भासकवीच्या नाटककथा | अनुवादित कथा | इ.स. १९१७ | |
मधली स्थिति(आजकालच्या गोष्टी) | सामाजिक कादंबरी | आधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशन | इ.स. १८८५ - इ.स. १८८८ |
माध्यान्ह | सामाजिक कादंबरी | इ.स. १९०६ - इ.स. १९०८ | |
मायेचा बाजार | सामाजिक कादंबरी | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १९१० - इ.स. १९१२ |
मारून मुटकून वैद्यबुवा | प्रहसन (रूपांतरित) | मूळ लेखक - मोलियर | इ.स. १९१० |
मी | सामाजिक कादंबरी | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १८९३ - इ.स. १८९५ |
म्हैसूरचा वाघ | अनुवादात्मक ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण) | इ.स. १८९० - इ.स. १८९१ | |
यशवंतराव खरे | सामाजिक कादंबरी | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १८९२ - इ.स. १८९५ |
रूपनगरची राजकन्या | ऐतिहासिक कादंबरी | रम्यकथा प्रकाशन | इ.स. १९०० - इ.स. १९०२ |
वज्राघात | ऐतिहासिक कादंबरी | इ.स. १९१३ - इ.स. १९१५ | |
विदग्धवाङ्मय | व्याख्यानपुस्तिका | इ.स. १९११ | |
शिष्यजनविलाप | श्लोकमय विलापिका | साप्ताहिक केसरी | मार्च, इ.स. १८८२ |
श्रुतकीर्तिचरित | नाटक(रूपांतरित) | ||
संत सखू | नाटक | इ.स. १९११ | |
सती पिंगळा | नाटक | इ.स. १९२१ | |
सुमतिविजय | नाटक(रूपांतरित) | मूळ विल्यम शेक्सपियर लिखित मेझर फाॅर मेझर | |
स्फुट गोष्टी -भाग १ ते ४ | कथासंग्रह | इ.स. १९१७ | |
सूर्यग्रहण | ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण) | इ.स. १९०८ - इ.स. १९०९ | |
सूर्योदय | ऐतिहासिक कादंबरी | इ.स. १९०५ - इ.स. १९०६ | |
हरीभाऊंचीं पत्रें [१] | पत्रसंग्रह | ऐक्यसंपादन मंडळ |
संदर्भ
- ^ हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे
ह.ना. आपटे यांच्यासंबंधीची पुस्तके
- आलोचना मासिकाचा हरि नारायण आपटे विशेषांक (इ.स. १९६३)
- सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर, सु. रा. चुनेकर)
- हरि नारायण आपटे (चरित्र, लेखक रा.भि. जोशी)
- हरि नारायण आपटे, चरित्र व वाङ्मयविवेचन (इ.स. १९३१) : लेखिका वेणूताई पानसे
- हरि नारायण आपटे यांचे संक्षिप्त चरित्र (इ.स. १९२२) : लेखक बापुजी मार्तंड आंबेकर
- ह.ना. आपटे कांहीं आठवणी आणि मनोरंजक प्रसंग (बापुजी मार्तंड आंबेकर)
- ह.ना. आपटे निवडक वाङ्मय : साहित्य अकादमी प्रकाशन (इ.स. १९८९) : संपादक विद्याधर पुंडलिक
- हरिभाऊ, काळ आणि कर्तृत्व (इ.स. १९७२) : लेखक वि.बा.आंबेकर.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |