सु.रा. चुनेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सु. रा. चुनेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


प्रा. डॉ. सु. रा. चुनेकर ऊर्फ सुरेश रामकृष्ण चुनेकर (जन्म : २७ एप्रिल १९३६; मृत्यू : १ एप्रिल २०१९) हे मराठी समीक्षक, संपादक आणि मराठी वाङ्मय सूचीकार होते. ते संगमनेर महाविद्यालय येथे तसेच मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे येथे प्राध्यापक होते. एम. ए. च्या परीक्षेत ते मराठी-संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांच्या पीएच. डी. प्रबंधास १९६३-६४ साली पारितोषिक मिळाले. त्यांनी विविध ग्रंथ संपादित केले असून अनेक वाङ्ममयीन नियतकालिकांत संशोधनपर व समीक्षात्मक लेखन केले आहे. ते 'मराठी विश्वकोश', 'मराठी वाङमयकोश' यांचे लेखक होते.' मराठी संशोधन पत्रिके' चे ते संपादक होते.[१] शिक्षण प्रसारक संस्थेच्या 'दर्शन' या ग्रंथाचे ते मुख्य संपादक होते.[१][२]

साहित्य संशोधनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असणारी ‘सूचीनिर्मिती’ ही अभ्यासकांसाठी मोठीच सोय असते आणि अशा अनेक सूचींची सूची तयार करण्याचे महत्त्वाचे काम चुनेकर यांनी केले. सुमारे पावणेसातशे सूचींमधून किमान तीस-पस्तीस हजार नोंदी संकलित करून एक मौलिक संदर्भसाहित्य त्यांनी उपलब्ध करून दिले.

शिक्षण[संपादन]

 • बी. ए. १९५६ : स. प. महाविद्यालय, पुणे
 • एम ए. १९५८ : पुणे विद्यापीठ, पुणे
 • पीएच. डी. १९६३ : पुणे विद्यापीठ, पुणे

कारकीर्द[संपादन]

 • प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
 • प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
 • मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन

लेखन[संपादन]

 • अंतरंग
 • जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध
 • जी.एं. ची निवडक पत्रे (चार खंड, संपादित, सहसंपादक : म.द. हातकणंगलेकर, श्री.पु. भागवत)
 • बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या कवितांची सूची तसेच समग्र वाङ्मयाची सूची
 • माधव ज्युलियन
 • माधव जूलिअन (मराठी कवी)
 • माधवराव पटवर्धन : वाङ्मयदर्शन
 • सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर)
 • सूचींची सूची

संपादन[संपादन]

 • जी.एं.ची निवडक पत्रे; खंड ३ व ४ (सहसंपादक : म.द. हातकणंगलेकर, श्री.पु. भागवत)
 • 'समग्र माधव ज्यूलियन' - संकलन व संपादन (सहसंपादक : प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले)[३]
 • सूचीची सूची
 • माडगांवकरांचे संकलित वाड्मय (संपादित; सहसंपादक - स.गं. मालशे)

पुरस्कार[संपादन]

 • सर्वोत्कृष्ट प्रबंध : अ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई विद्यापीठ[४]
 • राज्य पुरस्कार, १९७४-७५ : माधवराव पटवर्धन : वाङमयदर्शन

संदर्भ[संपादन]

 1. a b "दर्शन" ग्रंथ, पान ४९, संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; सूत्रचालक : प्राचार्य म. वि. कौंडिण्य; संयोजक व निमंत्रक : प्रा. सु.दा. मालवाडकर; मूळ कल्पना : कायर्कारी मंडळ, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; सहायक : प्रा. श्री. स. गोसावी; प्रकाशक : बा.ल. काटे, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; मांडणी सजावट : आय्&ZWBJ;ज ॲडव्हरटायझिंग, पुणे; मुद्रक : चि. सं. लाटकर, कल्पना मुद्रणालय ४६१/४, 'शिवपार्वती', टिळक रस्ता, पुणे ३०; प्रसिद्धी काल : १९८०, देणगी मूल्य: रु. १००/-
 2. ^ Dutt, Kartik Chandra (1999). Who's who of Indian Writers, 1999: A-M (en मजकूर). Sahitya Akademi. पान क्रमांक 256. आय.एस.बी.एन. 9788126008735. 
 3. ^ https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8
 4. ^ http://liveweb.archive.org/web/20121110084010/http://esakal.com/esakal/20090927/5466968332314581685.htm