Jump to content

"नागनाथ कोत्तापल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७८: ओळ ७८:
* स्त्री-पुरुष तुलना
* स्त्री-पुरुष तुलना


==पुरस्कार==
==नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार==
* पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार <ref name="मटा२">{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4946903.cms|शीर्षक=डॉ. नागनाथ कोत्तापल्ले|दिनांक=२९ ऑगस्ट २००९ |प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स|ॲक्सेसदिनांक=७ नोव्हेंबर २०१२}}</ref>
* पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार <ref name="मटा२">{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4946903.cms|शीर्षक=डॉ. नागनाथ कोत्तापल्ले|दिनांक=२९ ऑगस्ट २००९ |प्रकाशक=महाराष्ट्र टाइम्स|ॲक्सेसदिनांक=७ नोव्हेंबर २०१२}}</ref>
* महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले ग्रंथ
* महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले ग्रंथ
** मूड्स (१९७६)
** मूड्स (१९७६)
** संदर्भ (१९८४)
** संदर्भ (१९८४)
** गांधारीचे डोळे (१९८५)
** गांधारीचे डोळे (१९८५)
** ग्रामिण साहित्य (१९८५)
** ग्रामीण साहित्य (१९८५)
** उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)
** उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)
* ''ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध''साठी परिमल पुरस्कार (१९८५)
* ''ज्योतिपर्व'' साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)
* ''ज्योतिपर्व'' साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)
* दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)
* ''राख आणि पाऊस'' साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)
* ''राख आणि पाऊस'' साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)
* ''ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध'' साठी परिमल पुरस्कार (१९८५)
* ''साहित्य अवकाश'' साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार
* यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)
* यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)
* ''राख आणि पाऊस''साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)
* ''राख आणि पाऊस''साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)
* ''साहित्य अवकाश''साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार




==संदर्भ ==
==संदर्भ ==

१०:११, २९ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

नागनाथ कोत्तापल्ले

नागनाथ कोत्तापल्ले (जन्मः २९ मार्च, इ.स. १९४८;मुखेड, नांदेड- हयात) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक आहेत व राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत.[] ते ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

जीवन

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला.[] शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले..[] त्यांनी १९८० मध्ये पीएच. डी. मिळवली.

कारकीर्द

नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००४ पासून २००९ पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते.

मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन या संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते २०१२मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. [] [][]

कोतापल्ले यांचे किंवा त्यांच्यासंबंधीचे प्रकाशित साहित्य

  • डॉ.नागनाथ कोतापल्ले : व्यक्ती आणि वाङ्‌मय (संपादन : डॉ. शैलेश त्रिभुवन)

पुस्तके

कविता संग्रह

  • कृष्णमेघ
  • मूड्स

कादंबरी व कथासंग्रह

  • कर्फ्यू आणि इतर कथा
  • कवीची गोष्ट
  • गांधारीचे डोळे
  • देवाचे डोळे
  • पराभव
  • मध्यरात्र
  • रक्त आणि पाऊस
  • राजधानी
  • संदर्भ
  • सावित्रीचा निर्णय

समीक्षण, वैचारिक

  • अपार्थिवाचे गाणे
  • आधुनिक मराठी कविता: एक दृष्टिक्षेप
  • ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध
  • ज्योतिपर्व
  • दहा समीक्षक
  • नवकथाकार शंकर पाटील
  • निवडक बी. रघुनाथ
  • पाचोळा
  • पापुद्रे
  • साहित्याचा अन्वयार्थ
  • साहित्याचा अवकाश (समीक्षा)
  • स्त्री-पुरुष तुलना

नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार

  • पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार []
  • महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले ग्रंथ
    • मूड्स (१९७६)
    • संदर्भ (१९८४)
    • गांधारीचे डोळे (१९८५)
    • ग्रामीण साहित्य (१९८५)
    • उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)
  • ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोधसाठी परिमल पुरस्कार (१९८५)
  • ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)
  • दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)
  • यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)
  • राख आणि पाऊससाठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)
  • राख आणि पाऊससाठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)
  • साहित्य अवकाशसाठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार


संदर्भ

  1. ^ भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदी डॉ. कोत्तापल्ले
  2. ^ a b c http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17051150.cms. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17071237.cms. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/155009. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4946903.cms. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)