"चंद्रकांत खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''चंद्रकांत खोत''' ([[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९४०]] - [[डिसेंबर १०]], [[इ.स. २०१४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, संपादक होते. |
'''चंद्रकांत खोत''' (जन्म : भीमाशंकर, [[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९४०]] - मृत्यू : मुंबई, [[डिसेंबर १०]], [[इ.स. २०१४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, संपादक होते. |
||
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एम.ए. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसले तरी त्यांच्याच मुळगावातून येणार्या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएच.डी. करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती. |
|||
लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबर्यांसाठी चंद्रकांत खोत विशेष ओळखले जात. |
|||
== जीवन == |
== जीवन == |
||
ओळ ७: | ओळ ११: | ||
सौंदर्याचा अॅटम बाँब म्हणून प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री [[पद्मा चव्हाण]] यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते<ref>{{संकेतस्थळ|http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6509174.cms|महाराष्ट्र टाइम्स - सात रस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार;|मराठी}}</ref>. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला. |
सौंदर्याचा अॅटम बाँब म्हणून प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री [[पद्मा चव्हाण]] यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते<ref>{{संकेतस्थळ|http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6509174.cms|महाराष्ट्र टाइम्स - सात रस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार;|मराठी}}</ref>. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला. |
||
सगळे सामाजिक संकेत धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. |
सगळे सामाजिक संकेत धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. खोतांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री कोट्यातून घर मागितले होते. पण ते मिळाले नाही. ही खंत वृत्तपत्रांनी मांडल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. निधनाअगोदर, म्हणजे ७ सप्टेंबर २०१४ला मित्र परिवाराने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला होता. |
||
==लेखन== |
==लेखन== |
||
चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून आले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अन्वय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली. यानंतर दोन वर्षांनी ‘बिनधास्त’ आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘विषयांतर’ ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. या खोतांच्या कादंबर्यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती. |
|||
’अबकडई‘ या दिवाळी अंकाचे खोतांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणार्या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. दिवाळी अंकांचा इतिहास लिहायचा झाला तर या अंकांबाबत वेगळे प्रकरणच लिहावे लागेल. |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
१५:१०, १२ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
चंद्रकांत खोत (जन्म : भीमाशंकर, सप्टेंबर ७, इ.स. १९४० - मृत्यू : मुंबई, डिसेंबर १०, इ.स. २०१४) हे मराठी लेखक, संपादक होते.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एम.ए. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसले तरी त्यांच्याच मुळगावातून येणार्या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएच.डी. करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती.
लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबर्यांसाठी चंद्रकांत खोत विशेष ओळखले जात.
जीवन
मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्यावरील फरकॅप गायब झाली होती. पठाणी वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व लोप पावले होते. डोळ्यांत सुरमा नव्हता. पांढरीशुभ्र मोठी दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती. ते कुठे होते, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही. काही जण ते हिमालयात गेले होते, असे म्हणत असत. कारण आता त्यांचा ओढा आध्यात्मिकतेकडे वळला होता. भगवी वैराग्यवृत्ती अंगावर वागवत ते चिंचपोकळीजवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. तिथे येणारे भाविक भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना साधुपुरुष समजून त्यांच्या पाया पडत असत. त्यांनी अखेरचा श्वासही याच मंदिरात घेतला.
सौंदर्याचा अॅटम बाँब म्हणून प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते[२]. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला.
सगळे सामाजिक संकेत धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. खोतांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री कोट्यातून घर मागितले होते. पण ते मिळाले नाही. ही खंत वृत्तपत्रांनी मांडल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. निधनाअगोदर, म्हणजे ७ सप्टेंबर २०१४ला मित्र परिवाराने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला होता.
लेखन
चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून आले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अन्वय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली. यानंतर दोन वर्षांनी ‘बिनधास्त’ आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘विषयांतर’ ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. या खोतांच्या कादंबर्यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती.
’अबकडई‘ या दिवाळी अंकाचे खोतांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणार्या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. दिवाळी अंकांचा इतिहास लिहायचा झाला तर या अंकांबाबत वेगळे प्रकरणच लिहावे लागेल.
प्रकाशित साहित्य
- अंकाक्षर ज्ञान (संपादित अंकलिपी)
- अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र)
- अपभ्रंश (कवितासंग्रह किंवा कादंबरी)
- अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनावर)
- उभयान्वयी अव्यय (मुंबई परिसरातील पुरुषवेश्यांच्या जीवनावरील कादंबरी) (१९७०)
- गण गण गणात बोते (गजानन महाराजांचे चरित्र)
- चनिया मनिया बोर (मुलांसाठी कथा)
- दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी)
- बाराखडी(?)
- बिनधास्त (लैंगिक विषयावरील कादंबरी)
- बिंब प्रतिबिंब (विवेकानंदाच्या जीवनावरील
- मेरा नाम है शंकर (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
- विषयांतर (लैंगिक विषयावरील कादंबरी)
- संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
- हम गया नही, जिंदा है (स्वामी समर्थांच्या जीवनावरील कादंबरी)
कथासंग्रह
- दुरेघी (दोन दीर्घकथा)
काव्यसंग्रह
मर्तिक(१९६९)
संपादन
- अबकडई (दिवाळी अंक) (अनियतकालिक चळवळीतील एक अंक)
इतर
- गीत : घुमला हृदयी नाद हा (’यशोदा’ चित्रपटातले गीत, गायिका अनुराधा पौडवाल, संगीत दत्ता डावजेकर)
- गीत : धर धर धरा (’यशोदा’ चित्रपटातले गीत, गायिका ललिता डावजेकर, संगीत दत्ता डावजेकर)
- गीत : माळते मी माळते (’यशोदा’ चित्रपटातले गीत, गायिका वाणी जयराम, संगीत दत्ता डावजेकर)
- चंद्रकांत खोत : व्यक्ती आणि साहित्य (खोत यांच्या साहित्याचा आढावा घेणारे पुस्तक, लेखक डॉ. कृष्णा भवारी)
संदर्भ
लोकसत्ता दि. २३ जून २०१३
बाह्य दुवे
- ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
- ^ महाराष्ट्र टाइम्स - सात रस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार; (मराठी मजकूर)