आपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि कॉपीराइट रूल्स २०१३मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या वापरावयाच्या अटी आणि परवाना निती अन्वये तसेच मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.
आपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे विकिपीडिया:परवाने या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्ती/त्यागासाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्स येथून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.
अर्थात किमान स्वरुपाची व्यवस्था होताच हि सूचना (छाया)चीत्रे चढवलेल्या तांत्रिक दृष्ट्या शक्य सर्व सदस्यांना दिली जाऊन पुरेशा कालावधी नंतर सुयोग्य परवाना उपलब्ध न झालेली छायाचित्रे एकगठ्ठाही वगळली जाऊ शकतील. या कारणान्वये मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतरही माध्यमातून अनुपस्थीत सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन आहे.
सुयोग्य परवाना न जोडलेल्या संचिका काळाच्या ओघात प्रचालकांच्या सवडीनुसार वगळल्या जातात. अर्थात आपण स्वत: चढवलेल्या संचिका आपल्या स्वत:ची निर्मिती नसून प्रताधिकारांचे उल्लंघन करत असतील तर अशा (छाया)चित्र संचिका लवकरात लवकर वगळून देण्याची विनंती प्रचालकांना स्वत:हून करावी अशी अपेक्षा आहे (कायद्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही केलेल्या प्रताधिकारभंगांना केवळ तुम्हीच जबाबदार असता तेव्हा हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे).