Jump to content

विकिपीडिया:मराठी विश्वकोश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियावरील रिकाम्या लेखांचे प्रमाण कमी होण्यात अंशत: हातभार लागू शकेल. नवागतांकडून अनवधानाने मराठी विश्वकोशातून होणारे कॉपीपेस्टला मराठी विकिपीडियात अंशत: सामावून घेता येऊ शकेल.

मराठी विश्वकोशातून घेतलेल्या मजकुराची दोन उदाहरणे बनवली आहेत. आधीपासून असलेल्या लेखातील उदाहरण "गाहा_सत्तसई#शृंगार आणि उछृंखलता" विभाग; नविन लेखाचे उदाहरण "लवण". तुमच्या शाळेच्या आठवतो च्या गावातील सार्वजनिक ग्रंथालय तुम्ही गेल्या तर अनेक झाडं मोठी पुस्तके असलेल्या काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल मराठीच्या विविध साहित्य संपदा सोबत मराठी विश्वकोश मराठी मराठी चरित्र कसे मराठी शब्दकोश असे ग्रंथ वाचण्याचा पण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊ या विज्ञान विषयाची माहिती मिळाली समजून घेता येतो

पार्श्वभूमी[संपादन]

मराठी विकिपीडिया सदस्य:Rahuldeshmukh101 , सदस्य:अभय नातू, सदस्य:Mahitgar, सदस्य:Sudhanwa यांच्या सक्रीय प्रयत्नामुळे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा मराठी विश्वकोशाने अंशत: का होईना गैरव्यावसायिक वापरापुरते काही अटी मांडत, प्रताधिकार स्तर कमी केले हे त्यांच्या https://marathivishwakosh.maharashtra.gov.in या वेबसाईटला आज भेट दिल्या नंतर दिसून आले.[१]

प्रस्ताव[संपादन]

पब्लिक डोमेन मध्ये टाकलेले नसल्यामुळे आणि काही अटींसहीत कमर्शीअल आधिकार राखीव ठेवल्यामुळे, व त्यांच्या त्यांचे प्रताधिकारस्तर कमी करणे मराठी विकिपीडियाच्या प्रताधिकार परवान्याशी जसेचे तसे जुळणारे नाही. तसेच मराठी विश्वकोशातील पारिभाषिक शब्दांचे वेगळेपण, माहिती जुनी असणे आणि त्यांच्या माहितीत बदल करण्यात आपल्या मनुष्यबळाच्या मर्यादा लक्षात घेता मराठी विश्वकोशातील माहिती सरसकटपणे मराठी विकिपीडियावर घेणे रास्त होणार नाही. पण त्याच वेळी मर्यादीत प्रमाणांची अट टाकून अंशत: प्रायोगिक स्वरुपात सुरु करावयास हरकत नसावी म्हणून तसा प्रस्ताव आणि प्रकल्प मांडत आहे.


 • मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळाच्या अटींचे पालन करण्याची तसेच मजकुरात व संदर्भांमध्ये सुयोग्य बदल करण्याची तयारी असावी.
 • मराठी विश्वकोशाच्या व्यावसायिक संधीं बद्दल आदर ठेवावा
 • उपयोग कमीत कमी ठेवावा
  • प्रस्ताव:प्रतिलेख न बदललेला अधिकतम मजकुर, ४००० बाईट्स किंवा २ परिच्छेद जे कमी असेल ते मान्य असावे.
  • प्रति सक्रीय मराठी विकिपीडियन अधिकतम ५ लेखात माहिती आणण्यास परवानगी असावी.
  • मराठी विकिपीडियावर सुरवातीस एकुण अधिकतम १०० लेखांची अट असावी, मजकुर अद्ययावत ठेवणे आणि मराठी विश्वकोशाच्या अटी समजून घेणे आणि पाळण्याची मराठी विकिपीडिया सदस्य कितपत काळजी घेतात हे पाहून हि मर्यादा भविष्यात वाढवता येईल
 • इतर स्रोतातून मुक्त स्रोतातून समकक्ष माहितीची अनुपलब्धता असावी.
 • त्या लेखाच्या/विभागाच्या काँटॅक्स्टच्या द्ष्टीने घेतल्या जाणाऱ्या मजकुराची गरज असावी
 • केवळ लेख नामविश्वापुरता मर्यादीत असावा
 • मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रकाशित असावे, (अजून प्रकाशित झाले नाही अशी माहिती काही कारणाने मिळाल्यासही घेऊ नये)
 • मजकुर इतर विकिपीडिया संकेतांचे पालन करणारा असावा
 • हे विशीष्ट धोरण केवळ मराठी विश्वकोशाच्या https://marathivishwakosh.maharashtra.gov.in वेबसाईटवरील मजकुरासाठी मर्यादीत राहील.
 • या संदर्भाने सुसुत्रीकरण आणि नियोजनासाठी हे वेगळे प्रकल्प पान असावे.


मराठी विश्वकोशच्या वेबसाईटवर तळटिप, अटी आणि तात्पर्य[संपादन]

Copyright © 2017"गैरव्यावसायिक वापरासाठी विश्वकोशाचे स्वामित्व हक्क खुले करण्यात आले आहेत." (काही अटीसह) . संकेतस्थळ निर्मीती, सीडॅक जिस्ट, पुणे यांच्यामार्फत करण्यात आली.[२]

"काही अटीसह" हा दुवा https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/terms.html या पत्त्यावर उघडले तेथे दिसलेल्या अटी खालील प्रमाणे.

अटी

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या खंडाचे मूळ स्वरुप कायम ठेवून भारतीय कॉपीराईट अधिनियम, १९५७ च्या कलम २१ मधील तरतुदीनुसार मराठी विश्वकोशाचे स्वामित्व हक्क गैरव्यावसायिक वापरासाठी खुले करण्यात आले आहेत." त्या अटी खालीलप्रमाणे आहेत.

१) मराठी विश्वकोशामध्ये संग्रहित केलेली माहिती मूळ स्वरूपात तशीच कायम राहील.

२) विश्वकोशातील माहितीचा वापर करायचा असल्यास एक स्रोत म्हणून वापर करावा.

३) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या खंडाचा, नोंदीचा, लेखकाचा योग्य तेथे संदर्भ म्हणून उल्लेख असावा.

४) वाचकांना मूळ नोंद पाहण्यासाठई या कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाण्याची सोय असावी. (संकेतस्थळाचा पत्ता - www.marathivishwakosh.maharashtra.gov.in)

५) विश्वकोशातील माहितीचा वापर केल्यानंतर एखादी व्यक्ती व संस्था त्यामध्ये जो बदल करेल ती त्या व्यक्ती व संस्थेची स्वंतंत्र निर्मिती व जबाबदारी राहील. त्याची जबाबदारी विश्वकोश मंडळाची राहणार नाही. [३]

मराठी विकिपीडियनसाठी तात्पर्य[संपादन]

१) मराठी विश्वकोशातून माहिती जशीच्या तशी आणली तर; मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या खंडाचा, नोंदीचा, लेखकाचा योग्य तेथे संदर्भ आणि मराठी विश्वकोशातील लेखाचा दुवा देणे अभिप्रेत आहे,

२‌) त्यांच्या मजकुरात जो पर्यंत बदल केला जात नाही तो पर्यंत गैरव्यावसायिक उपयोगास परवानगी नसल्याचे संबंधीत विभागातील साचातून वाचकास समजले पाहिजे, [असे का? १] [असे का? २]

३‌) विकिमिडीया फाऊंडेशनला अभिप्रेत अधिकतम मजकुर क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/ शी मॅच होण्याच्या दृष्टीने अशा मजकुरास शक्य तेवढ्या लवकर बदलावे./अद्ययावत करावे

४) मराठी विश्वकोशाच्या मजकुरात बदल केल्या नंतर संबधीत संदर्भात बदल करणाऱ्या व्यक्तीची स्वंतंत्र निर्मिती व जबाबदारी राहील. त्याची जबाबदारी विश्वकोश मंडळाची राहणार नाही. आणि विकिपीडियाचा उत्तरदायकत्वास नकार लागू राहील हे संदर्भात नोंदवावे.

प्रस्ताव समर्थन अथवा विरोध[संपादन]

समर्थन/विरोध मत
पाठिंबा- माझे समर्थन आहे. कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:४०, १५ जानेवारी २०१७ (IST)[reply]
पाठिंबा- माझे समर्थन आहे. कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.
--वि. नरसीकर (चर्चा) १६:२१, १५ जानेवारी २०१७ (IST)[reply]
योग्य ते पाऊल आहे.
पाठिंबा- माझे समर्थन आहे. कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.
--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २२:४३, १७ जानेवारी २०१७ (IST)[reply]

साचे आणि संदर्भ कसे जोडावेत[संपादन]

{{साचा:कॉपीपेस्टमवि}} खालील प्रमाणे दिसेल.

* निम्न लिखीत परीच्छेद मराठी विश्वकोशातून भारतीय कॉपीराईट अधिनियम, १९५७ च्या कलम २१ मधील तरतुदीनुसार मराठी विश्वकोशाचे स्वामित्व हक्क गैरव्यावसायिक वापरासाठी खुले असलेल्या संस्थळावरुन घेण्यात आला आहे. मराठी विकिपीडियावरील अशा वापरासाठी विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे नमुद संकेतांचे अनुपालन अपेक्षित आहे. (विशेषत: प्रतिलेख अधिकतम असंपादीत कॉपीपेस्ट मराठी विश्वकोशातून आयात मजकुर ४००० बाईट किंवा दोनपरिच्छेद पेक्षा अधिक असू नये.) या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय, पूर्ण प्रताधिकारमुक्त होण्यासाठी ह्या आयात मजकुराचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर संदर्भात नमुद करुन हा साचा येथून काढावा. केवळ उदाहरणासाठी

महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश क्रमांक ..... दिनांक .... महाराष्ट्र शासन संस्थळ दुवा आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ मुंबई यांचे (संस्थळ दुवा) आणि भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ (कलम २१ ला अनुसरून) अन्वये सदर मर्यादीत मजकुर गैरव्यावसायिक उपयोगासाठी खुला आहे. कसे दिसेल याचे उदाहरण. हा मजकुर 'केवळ 'गैर-व्यावसायिक उपयोगासाठी मराठी विश्वकोशमंडळ आणि विश्वकोशातील संबंधीत लेखकाचे संदर्भार्थ नामोल्लेख करून आपण वापरण्यास पुर्नवितरीत करण्यास मुक्त असण्याची शक्यता असू शकते. (पण असा कोणताही वापर आपल्यात आणि विकिपीडिया अथवा त्याच्या कोणत्याही घटकाशी कोणताही करार निर्मित करत नाही विकिपिडीया उत्तरदायकत्वास नकार लागू)

* निम्न लिखीत परीच्छेद मजकुर मराठी विकिपीडियाच्या नियमीत परवान्यांतर्गत येण्यासाठी काय करावे लागेल ?

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ मुंबई आणि महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश क्रमांक ..... दिनांक .... महाराष्ट्र शासन संस्थळ दुवा अन्वये सदर मजकुरात एखाद्या लेखकाने किमान स्वरूपाचे बदल करून स्व-जबाबदारीवर पुर्नलेखन केल्यास असा मजकुर महाराष्ट्र राज्यशासन अथवा महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ यांच्या कोणत्याही जबाबदारी शिवाय पण त्यांचे संदर्भ नमुद करून भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ च्या कलम ५७ मध्ये अनुस्यूत मूळ लेखकांच्या नामोल्लेखाचे आणि त्यांच्या रेप्युटेशन आणि ऑनरला धकका न लाविता असा मजकुर महारष्ट्रराज्य विश्वकोश मंडळाच्या मराठी विश्वकोशाचे कॉपीराईट मालक महाराष्ट्र शासन यांच्या कडून प्रताधिकार मुक्त होणे अभिप्रेत असल्याचे कळते.

ज्या अर्थी मराठी विकिपीडिया आणि इतर विकिप्रकल्पांवरचा मजकुरास मुख्यत्वे Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0) लायसन्स अन्वये अधिक वरच्या स्तराची मुक्तता देणे अभिप्रेत असते ज्यात पुर्नवापरकर्त्या व्यक्तीस व्यावसायीक उपयोगासही अडथळा नसतो (असे का ? दुवा) विकिपीडियाच्या मुल्यव्यवस्थेस अनुसरून सदर निम्नलिखीत परिच्छेदास (मूळ लेखकाची कोणतीही बदनामीस कारण होणार नाही अशा पद्धतीने) लेखनात किमान बदल करून असे लेखन कॉपीराइटमुक्त करण्याच्या मराठी विश्वकोश मंडळ आणि महाराष्ट्रशासन सौजन्याने पुरस्कृत शासकीय सवलतीचा लाभ करून द्यावा. जेणे करून पूर्णत: प्रताधिकार मुक्त झालेला मजकुर विवीध भाषी विकिपीडियातून अनुवादीत करण्यास आणि इतर दृकश्राव्यादी माध्यमातून अथवा मराठी सोशल नेटवर्कींग संकेतस्थळांवरून पुर्नप्रसारीत होण्यातील अडथळे कमीत कमी होतील.

* मराठी विश्वकोशा शिवाय इतर मजकुरास अशा विनंत्या मराठी विकिपीडियावर ग्राह्य होण्याची शक्यता कमी का असेल ?
 • मराठी विकिपीडिया मजकुरात बदल केल्यानंतर मजकुर कॉपीराईट फ्री होण्याची संभावना असल्यामुळे मराठी विश्वकोशाच्या मर्यादीत मुक्त परवाण्याच्या मजकुरास किमान स्वरूपाची तात्कालीक मान्यता देते. विकिपीडिया प्रकल्पातील मजकुर सहसा मुक्त सांस्कृतिक काम आणि Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0) लायसन्स अन्वये अभिप्रेत असल्यामुळे मराठी विश्वकोशातून येणाऱ्या मजकुरास दिला जाणारा अपवाद इतर मजकुरांना दिला जाण्याशी शक्यता कमीतकमी असेल आणि अशा कोणत्याही वेगळ्या केससाठी मराठी विकिपीडिया प्रचालक मंडळ आणि समुदाय सहमतीने निर्णय वेगवेगळे असतील

हा सद्य साचा म.शा. ची मंजुरी प्राप्त झाल्यास ढोबळ स्वरूपाचे केवळ उदाहरणार्थ प्रत्यक्ष मान्यता मिळाल्यास मजकुराचे अंतीम स्वरूप मान्यते वर आणि मराठी विकिपीडिया सदस्य सहमतीस अनुसरून सुधारीत केले जाईल आणि दृश्य रचना वाचकास सुलभ अशा पद्धतीने बदलली जाईल."

* उत्तरदायकत्वास नकार

मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर माहिती आणताना सुयोग्य परवाना साचे लावणे, सुयोग्य पद्धतीने संदर्भ देणे; अथवा मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर आलेल्या माहितीच्या वापरापुर्वी, मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर आलेल्या माहितीच्या आणि त्याच्या कॉपीराइट परवान्याची शहानिशा करून घेणे याची जबाबदारी ज्या त्या व्यक्तीची व्यक्तीश: असते.

मर्यादित परवाना; कंत्राट नव्हे

येथे उपलब्ध केलेली/झालेली माहिती सहसा मुक्त स्वरूपात उपलब्ध केली जाते, मराठी विश्वकोसातून येणारा मजकुर तसेच छायाचित्रांच्या वापरावर अधिक मर्यादा/विशीष्ट बंधने असू शकतात की जी ज्याची त्याने स्व-जबाबदारीवर पाळावयाची असतात हे आपणास समजले असल्याची कृपा करून खात्री करून घ्या. तुम्ही आणि या संस्थळाचे (site) मालक अथवा या संकेतस्थळाचे उपयोगकर्ते यांचा आपापसात कोणताही करार अथवा समझोता उद्भवत नाही. हे संस्थळ स्थापित असलेल्या विदादात्यांचे मालक (owners of the servers), व्यक्तिगत विकिपीडिया योगदानकर्ते, प्रकल्प-प्रचालक(प्रबंधक), प्रचालक किंवा या प्रकल्पाशी किंवा त्याच्या सहप्रकल्पांशी कोणत्याही प्रकारे संबधित इतर जण, यांतला कोणीही त्यांच्या विरोधातील तुमच्या कोणत्याही दाव्यास प्रत्यक्ष जबाबदार (जिम्मेवार) असणार नाही.

तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही. [श १]

.... ....विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार पानाकडे. ..... ....पहा साहाय्य:मराठी विकिपीडियावरचे मराठी विश्वकोश मजकुर पुर्नवापर साहाय्य पान ((*)) [ मराठी विश्वकोश संस्थळावरील पुर्नवापर आणि कॉपीराइट मार्गदर्स्न दुवा]

 1. ^ इंग्लिश: You are being granted a limited license to copy anything from this site; it does not create or imply any contractual or extracontractual liability on the part of Wikipedia or any of its agents, members, organizers or other users., मराठी: तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही.***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***


संदर्भ उदाहरण १[संपादन]

<ref name="केळकर_आणि_दातार">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = दि. श्री.; | आडनाव = दातार | लेखक = दातार, दि. श्री.; | सहलेखक = केळकर, गो. रा. | शीर्षक = मराठी विश्वकोश | मालिका = (जर पुस्तक कोणत्या पुस्तकमालेचा भाग असेल, तर त्या पुस्तकमालेचे नाव) | प्रकरण = मीठ | भाषा = मराठी | संपादक = संपादक: (कै.) [[लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी]] | प्रकाशक = महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | आवृत्ती = (पुस्तकाची प्रकाशन आवृत्ती) | दिनांक = | महिना = | वर्ष = (पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष) | फॉरमॅट = ऑनलाईन संकेतस्थळातून | अन्य = (आवृत्तीविषयक इतर माहिती) | पृष्ठ = ? | पृष्ठे = ?? | आयएसबीएन = (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) | दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/ | संदर्भ = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand13/index.php/component/content/article?id=10465 | अ‍ॅक्सेसदिनांक = ३०, सप्टेंबर २०१५ रात्रौ १२ ०५ | अ‍ॅक्सेसमहिना = सप्टेंबर | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१५ | अवतरण = पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे : "रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात." ...."रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे." }}</ref>

संदर्भ उदाहरण २[संपादन]

<ref>{{cite encyclopedia |title= गरुड-१ |encyclopedia= मराठी विश्वकोश |author= ठाकूर अ. ना. |volume= खंड ४ |publisher= महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ |location= मुंबई |id= ७१२४ |url= https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi?id=7124 }}</ref>

हे संदर्भ सुद्धा पहा[संपादन]

नोंदी[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले