Jump to content

विकिपीडिया:चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिकणे :


* नेहमी विचारले जाणारे प्रश्न
  • मराठी विकिपीडियावरही संचिका चढवता येतात का ?
होय, पण भारतीय नकाशांसारखे काही अपवाद सोडल्यास मराठी विकिपीडियावर संचिका चढवण्यात फारसा काही पॉईंट नाही. उलट पक्षी महाराष्ट्रीय संस्कृती विषयक छायाचित्रे इतर भाषी प्रकल्पातून दर्शवणे कठीणच होते. तीच बाब चित्रे कॉमन्स प्रकल्पात असतील तर दर्शवणे सोपे जाते.
  • मराठी विकिपीडियावर इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे उचित उपयोग तत्वावरील छायाचित्रे चढवलेली दिसतात.
भारतीय कॉपीराईट कायद्या बद्दलच्या अनभिज्ञतेतून असे घडते. वस्तुत: विकिपीडियास भारतीय कायद्यातील Fiar deal (fair use) तत्व उपयोगात आणता येते का हि साशंकीत बाब असून तसे करणे कायदेविषयक भूमीकेतून तुमच्या स्वत:साठी जोखिमीचे ठरणारच नाही असे निश्चितपणे सांगता येत नाही. या जोखिमी बाबत अधिक चर्चा इथे वाचावयास मिळेल
    • विकिपीडियाचे सर्वर आमेरीकेत असल्याचा सार्वत्रिक दावा इंग्रजी विकिपीडिया आणि इतरत्र वाचण्यास मिळतो त्याचे काय?
सर्वर दुसऱ्या देशात असणे पुरेसे नसावे. कायदा मोडणारा मुख्यत्वे कोणत्या देशाचा रहिवासी आहे आणि कायदा भंगामुळे कुणाचे नुकसान होते आहे अशा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे, महत्वाचे मराठी विकिपीडियाचे बहुसंख्य सदस्य महाराष्ट्रीय आहेत भारतीय कायद्यांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या अधिन कार्यवाही होण्याची शक्यता चांगल्याच प्रमाणात शिल्लक राहते.
    • भारतीय कायद्याच्या कक्षेत राहून मी उचित उपयोग छायाचित्रे कशी चढवू शकतो.
संबंधीत छायाचित्र अथवा ट्रेडमार्क लोगो मालकांच्या केवळ लेखी परवानगीनेच यात, लेखी परवानगी मिळवण्यास भारतीय कायद्याच्या दृष्टीकोणातून सध्या दुसरा पर्याय नाही.
    • तरीही मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत असे चित्र मराठी विकिपीडियावर चढवू इच्छितो
या संदर्भात भारतीय कायदा भारताच्या संसदेने बदलावा किंवा बहुधा सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील अनावश्यक बंधन दूर करावयाचे म्हणून ट्रेडमार्क्स आणि पोस्टर्स इत्यादी छायाचित्रे चढवण्यास उचित उपयोग तत्वाखाली मान्यता द्यावयास हवी. आपण गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयास पटवून देण्यावर विश्वास असेल आणि स्व:जबाबदारीवर जोखीम घेऊ इच्छित असाल तर मराठी विकिपीडियावर इतर निकषांना बांधील राहून सुविधा उपलब्ध आहेत.


सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथे चढवण्यास प्राथमिकता द्यावी. विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते






(काही जोखीम असल्यास स्विकारण्यास तयार अथवा मला भारतीय नकाशाचे सुयोग्य चित्र चढवायचे आहे अथवा कसेही करुन मराठी विकिपीडियावरच चित्र चढवायचे आहे ?)