राष्ट्रीय समाज पक्ष
राष्ट्रीय समाज पक्ष | |
---|---|
पक्षाध्यक्ष | महादेव जानकर |
स्थापना | २००३ |
मुख्यालय | १/बी ३५, हमाम स्ट्रीट,
अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट मुंबई ४०० ०२३ |
युती | राष्ट्रीय लोकशाही आघाडी |
संकेतस्थळ | [१] |
राष्ट्रीय समाज पक्ष एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना २००३ मध्ये झाली. महादेव जानकर हेेे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.[ संदर्भ हवा ] या पक्षाने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, तमिळनाडू मध्यप्रदेश विधानसभा निवडणूका लढविल्या आहेत. सध्या ८ राज्यात पक्ष कार्यरत आहे. २०१७ झालेल्या महाराष्ट्रातील निवडणूकीत रा.स.प. ने जिल्हापरिषदेवर १२ आणि तालुका पंचायतवर १८ सभासद निवडून आणले. ०.२ मतदान मिळवून राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.[ संदर्भ हवा ]
२००३ साली पक्ष स्थापन करून २०१३ पर्यंत ग्रामपंचायत, ते विधानसभा- लोकसभा लढविणे आणि जिंकणे, हेच ध्येय होते.
- २००९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार श्री. बाबासाहेब पाटील, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ मधून निवडून आला आहे.
ब्राह्मण –मराठा ते जैन – मुस्लिम अल्पसंख्य समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतो. “एकात्म राष्ट्र निर्माण” हे त्यांनी आपले ध्येय बनविले आहे. राजकीय सत्ता हे साध्य तर राष्ट्रीय समाज पक्ष हे साधन आणि वाहन बनाविले आहे. त्याच बरोबर पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सन २०१४ची लोकसभा महाराष्ट्रातील बारामती लोकसभा निवडणूक लढवली, त्यामध्ये शरद पवार यांच्या बालेकिल्यात जवळ पास ५ लाखापर्यंत मतदान मिळवून राजकिय भूकंप घडविला.[ संदर्भ हवा ]
- त्या पाठोपाठ २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये दौंड मधून रासपचे उमेदवार राहुल सुभाष कुल हे १४ हजारांच्या वर आघाडी घेऊन निवडून आले.
- २०१९ व २०२४ मध्ये गंगाखेड येथील रत्नाकर माणिकराव गुट्टे यांनी सलगपणे विजय मिळवला होता.