Jump to content

"द.ता. भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३२: ओळ ३२:
* साहित्य : आस्वाद आणि अनुभव
* साहित्य : आस्वाद आणि अनुभव


==द.ता. भोसले यांना मिळालेले सन्मान पुरस्कार ==
==द.ता. भोसले यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान (एकूण ५२हून अधिक)==
* महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद (पुणे आणि मुंबई), राजर्षी शाहू शिक्षण परिषद, केसरी-मराठा ट्रस्ट आदींकडून अनेकदा पुरस्कार
* [[न.चिं. केळकर]] पुरस्कार
* महर्षी [[विठ्ठल रामजी शिंदे|वि.रा. शिंदे]] पुरस्कार
* भैरूरतन दमाणी पुरस्कार
* संस्कृतीच्या पाऊलखुणा या पुस्तकाला नऊ पुरस्कार. या पुस्तकाची इंग्राजी आवृत्ती ’मॅकमिलन’ प्रकाशनातर्फे प्रकाशित.
* २०१४ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ’मसाप सन्मान’
* २०१४ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ’मसाप सन्मान’
* विखे पाटील साहित्य पुरस्कार -२००८ (लोकोत्तर गाडगेबाबा... या पुस्तकासाठी)
* विखे पाटील साहित्य पुरस्कार -२००८ (लोकोत्तर गाडगेबाबा... या पुस्तकासाठी)
ओळ ३८: ओळ ४३:
* सातारा विद्या प्रसारक मंडळाचा यंदाचा "सामाजिक कृतज्ञता पुरस्कार‘ (२०१२)
* सातारा विद्या प्रसारक मंडळाचा यंदाचा "सामाजिक कृतज्ञता पुरस्कार‘ (२०१२)
* द.ता. भोसले यांच्या नावाने सातार्‍यात ’डॉ. द.ता.भोसले वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था’ स्थापन झाली आहे.
* द.ता. भोसले यांच्या नावाने सातार्‍यात ’डॉ. द.ता.भोसले वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था’ स्थापन झाली आहे.
* आचार्य अत्रे पुरस्कार




ओळ ४८: ओळ ५४:


[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३५ मधील जन्म]]


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==

२३:४२, १६ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

ओळख

द.ता. भोसले, म्हणजे दशरथ तायापा भोसले (जन्म : ८ मे,इ.स. १९३५) हीक मराठी लेखक आहेत. मराठी साहित्यात १९६० च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नांव म्हणजे डॉ. द.ता. भोसले. त्यांनी कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन केले. त्यांच्या काही कथा 'द. ता. भोसले यांच्या निवडक कथा'मध्ये संकलित झाल्या आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेत, शेतमजूर, तेथील संस्कृती, ताणतणाव आदी विविध समस्या, माणसाची भूक, दारिद्र्‍य हे त्यांच्या 'वावटळ' 'नाथा वामण', 'अन्न' अशा विविध कथांमधून दिसते. शहरातील बकालपणावरही त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या लिखाणात विनोदाचा शिडकावाही असतो. अशा प्रकारे समाजजीवनाचे यथार्थ जीवन त्यांच्या कथांमध्ये दिसते. खेड्यांतील मुलामुलींच्या शिक्षणासाठी ते २५हून अधिक वर्षे भरीव आर्थिक मदत करीत आहेत.

द.ता. भोसले यांनी लिहिलेल्या काही ग्रंथांचा अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, धारवाड, नांदेड, पुणे, बडोदा, सोलापूर आदी विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून समावेश झाला आहे. एक अभ्यासू वक्ता म्हणून भोसले यांचा नावलौकिक आहे.

शिक्षण

द.ता. भोसले हे एम.ए.पीएच.डी आहेत. बी.ए.च्या परीक्षेत ते पुणे विद्यापीठातून पहिले आले होते. त्यांनआ त्यावेळी एक सुवर्णपदक, चार पारितोषिके आणि दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या होत्या. एम.ए.ची परीक्षा ते उच्च दुसर्‍या वर्गात उत्तीर्ण झाले.

कारकीर्द

  • डॉ. द.ता. भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अनेक महाविद्यालयांत प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख म्हणून ३२ वर्षे काम केले आहे. ते काही काळ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि प्राचार्यही होते.
  • द.ता. भोसले यांना पुणे आणि कोल्हापूर विद्यापीठाच्या अनेक समित्या-उपसमित्यांमध्ये चेअरमन तसेच सदस्य म्हणून कामाचा अनुभव आहे.
  • ग्रामीण साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, साहित्य अकादमी, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ या संस्थांनी आयोजित केलेल्या अनेक चर्चासत्रांत द.ता. भोसले यांनी भाग घेतला आहे.
  • द.ता. भोसले यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती समितीत सदस्य म्हणून सक्रिय सहभाग घेऊन शासनातर्फे प्रसिद्ध झालेल्या क्रमिक पुस्तकांचे संपादन केले आहे.
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि ग्रामीण साहित्य संमेलन यांमध्ये झालेल्या परिसंवादांत वक्ता म्हणून तसेच अध्यक्ष म्हणून २४हून अधिक वेळा सहभाग.
  • विविध वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्तीत साताहून अधिक वेळा सदर लेखन.

प्रकाशित साहित्य

लोकजीवनावरील व लोकसंस्कृतीवरील साहित्याच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दोन कादंबर्‍या, सात कथासंग्रह, सहाच ललितलेख संग्रह, लोकसंस्कृतीवरील पाच ग्रंथ, चार वैचारिक ग्रंथ, समीक्षा, चरित्रपर सात ग्रंथ, सोळा संपादित ग्रंथ, दोन ग्रामीण बोलींचे शब्दकोश, वगैरे. काही अपुस्तकांच्या हिंदी आवृत्त्या प्रसिद्ध.

द.ता. भोसले यांची पुस्तके

  • अगं अगं म्हशी
  • आठवणीतला दिवस
  • ग्रामीण साहित्य : एक चिंतन
  • चावडीवरचा दिवा (साहित्य आणि समीक्षा)
  • द.ता.भोसले यांच्या निवडक कथा (संपादक : डॉ.नागनाथ कोतापल्ले, डॉ.बिरा पारसे)
  • बाळमुठीतले दिवस (आत्मचित्रात्मक)
  • मनस्विनी
  • मी आणि माझा बाप
  • लोकसंस्कृती : स्वरूप आणि विशेष (वैचारिक)
  • लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य
  • लोपलेल्या सुवर्णमुद्रा
  • साहित्य : आस्वाद आणि अनुभव

द.ता. भोसले यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान (एकूण ५२हून अधिक)

  • महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद (पुणे आणि मुंबई), राजर्षी शाहू शिक्षण परिषद, केसरी-मराठा ट्रस्ट आदींकडून अनेकदा पुरस्कार
  • न.चिं. केळकर पुरस्कार
  • महर्षी वि.रा. शिंदे पुरस्कार
  • भैरूरतन दमाणी पुरस्कार
  • संस्कृतीच्या पाऊलखुणा या पुस्तकाला नऊ पुरस्कार. या पुस्तकाची इंग्राजी आवृत्ती ’मॅकमिलन’ प्रकाशनातर्फे प्रकाशित.
  • २०१४ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ’मसाप सन्मान’
  • विखे पाटील साहित्य पुरस्कार -२००८ (लोकोत्तर गाडगेबाबा... या पुस्तकासाठी)
  • डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या नावे दिला जाणारा साहित्यसेवेसाठीचा पुरस्कार
  • सातारा विद्या प्रसारक मंडळाचा यंदाचा "सामाजिक कृतज्ञता पुरस्कार‘ (२०१२)
  • द.ता. भोसले यांच्या नावाने सातार्‍यात ’डॉ. द.ता.भोसले वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था’ स्थापन झाली आहे.
  • आचार्य अत्रे पुरस्कार

प्रकाशित साहित्य

  • आठवणीतला दिवस
  • चावडीवरचा दिवा
  • द.ता. भोसले यांच्या निवडक कथा
  • बाळमुठीतील दिवस
  • मनस्विनी
  • मी आणि माझा बाप : इरसाल बाप आणि त्याच्या संगतीने अधिक इरसाल झालेला मुलगा यांच्या जगण्यातून निर्माण झालेला सहज, स्वाभाविक, निकोप नि प्रसन्न विनोद आणि त्यातून दिसणारे भाबडे नि वास्तव ग्रामजीवन हे या ग्रामीण विनोदी कादंबरीचे बलस्थान आहे.
  • लोकोत्तर
  • लोपलेल्या सुवर्णमुद्रा

पुरस्कार

संदर्भ