वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ - १७६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, वांद्रे पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १०४३, १०४५, जनगणना वॉर्ड क्र. १०४८ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ५८, ७७ ते ९४ यांचा समावेश होतो. वांद्रे पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे झिशान झियाऊद्दीन सिद्दिकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ झिशान झियाऊद्दीन सिद्दिकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ प्रकाश (बाळा) वसंत सावंत शिवसेना
२००९ प्रकाश (बाळा) वसंत सावंत शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".