Jump to content

वि.स. खांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वि. स. खांडेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
विष्णू सखाराम खांडेकर
विष्णू सखाराम खांडेकर
जन्म नाव गणेश आत्माराम खांडेकर
जन्म ११ जानेवारी १८९८
सांगली
मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६
मिरज
कार्यक्षेत्र कादंबरीकार
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती ययाति
वडील आत्माराम रामचंद्र खांडेकर
अपत्ये मंदाकिनी
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (ययाति १९७४ )

विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.

पूर्वायुष्य

वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. [ संदर्भ हवा ]

खांडेकरांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.

त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.

व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य

  • इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
  • तेथे त्यांनी इ.स. १९३८पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
  • आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.[ संदर्भ हवा ]

पुस्तके

नावसाहित्य प्रकारप्रकाशन वर्षनोंदी
अजून येतो वास फुलांनाकथासंग्रह—
अमृतपटकथा१९४१प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट
अमृतवेलकादंबरी१९६१
अविनाशनाटक—
अश्रूकथासंग्रह—
अश्रू आणि हास्यनिबंधसंग्रह—
आगरकर : व्यक्ती आणि विचारवैचारिक / व्यक्तिचित्रण—गोपाळ गणेश आगरकर यांच्या जीवन व विचारांवर आधारित समीक्षा
उल्काकादंबरी व पटकथा१९३४कादंबरीवरून चित्रपटाची निर्मिती
उःशापकादंबरी—
कल्पलतानिबंधसंग्रह—
कांचनमृगकादंबरी१९३१
कालची स्वप्नेकथासंग्रह—
कालिकाकथासंग्रह—
क्रौंचवधकादंबरी१९४२
घरटेकथासंग्रह—
घरट्याबाहेरकथासंग्रह—
चंदेरी स्वप्नेकथासंग्रह—
चांदण्यातकथासंग्रह—
छायापटकथा१९३६हंस चित्राचा चित्रपट
जळलेला मोहरकादंबरी१९४७
जीवनशिल्पीव्यक्तिचित्रे—
ज्वालापटकथा१९३८
झिमझिमरूपककथा संग्रह—
तिसरा प्रहरनिबंधसंग्रह—
तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३पत्रसाहित्य—
ते दिवस, ती माणसेआत्मचरित्रात्मक / आठवणी—
दंवबिंदूरूपककथा संग्रह—
देवतापटकथा१९३९
दोन ध्रुवकादंबरी१९३४
दोन मनेकादंबरी१९३८
धर्मपत्नीपटकथा१९४१
धुकेकथासंग्रह—
नवा प्रातःकालनिबंधसंग्रह—
परदेशीपटकथा१९५३
पहिली लाटकथासंग्रह—
पहिले पानकथासंग्रह—
पहिले प्रेमकादंबरी१९४०
पाकळ्यारूपककथा संग्रह—
पांढरे ढगकादंबरी१९४९
पारिजात भाग १, २कथासंग्रह—
पाषाणपूजाकथासंग्रह—
पूजनकथासंग्रह—
फुले आणि काटेनिबंधसंग्रह—
फुले आणि दगडकथासंग्रह—
मंजिऱ्याकथासंग्रह—
मंझधारकथासंग्रह—
मंदाकिनीकादंबरी१९३८
मध्यरात्रकथासंग्रह—
मृगजळातील कळ्याकथासंग्रह—
ययातिकादंबरी१९५६ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४; मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ), साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०)[१]
रंग आणि गंधनिबंधसंग्रह—
रिकामा देव्हाराकादंबरी१९३९
रेखा आणि रंगकथासंग्रह—
लग्न पहावे करूनपटकथा व संवाद१९४०
वामन मल्हार जोशी : व्यक्ति-विचारसमीक्षा / वैचारिक—वामन मल्हार जोशी यांच्या साहित्याचा अभ्यास
वायुलहरीनिबंधसंग्रह—
वासंतिकाकथासंग्रह—
विद्युत्‌ प्रकाशनिबंधसंग्रह—
वेचलेली फुलेकथासंग्रह१९४८
समाजशिल्पीलेख / संपादन—संपादन: सुनीलकुमार लवटे
समाधीवरील फुलेकथासंग्रह—
सहा भाषणेभाषणसंग्रह—
सांजवातकथासंग्रह—
साहित्यशिल्पीलेख / संपादन—संपादन: सुनीलकुमार लवटे
सुखाचा शोधकादंबरी१९३३
सुवर्णकणरूपककथा संग्रह—
सूर्यकमळेकथासंग्रह—
सोनेरी सावलीपटकथा—
सोनेरी स्वप्ने भंगलेलीकथासंग्रह—
स्त्री आणि पुरुषनिबंधसंग्रह—
हिरवळकथासंग्रह—
हिरवा चाफाकादंबरी१९३८
हृदयाची हाककादंबरी१९३०खांडेकरांची पहिली कादंबरी
क्षितिजस्पर्शनिबंधसंग्रह—

पटकथा

'अंतरिचा दिवा' हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे.

खांडेकरांचे चरित्र

पुरस्कार आणि सन्मान

संदर्भ

  1. ↑ "अन् मराठी भाषेला मिळाला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार". eSakal. २०२६-१०-११ रोजी पाहिले.
  2. ↑ महानगर, आपले. "ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक". आपले महानगर.

बाह्यदुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: