Jump to content

"काका गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १२८: ओळ १२८:
== गौरव ==
== गौरव ==
* पुण्यात न.वि. गाडगीळ यांच्या नावाचा नदी-पूल आहे.
* पुण्यात न.वि. गाडगीळ यांच्या नावाचा नदी-पूल आहे.
* पुण्यातील शनिवारवाड्याजवळ काकासाहेब गाडगिळांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
* पुण्यातील शनिवारवाड्याजवळ काकासाहेब गाडगिळांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
* मुंबईत दादर पश्चिम येथे काकासाहेब गाडगीळ मार्ग आहे. या मार्गावरील [[टिळक]] भवन या इमारतीत काँग्रेसचे कार्यालय आहे.


==प्रतिष्ठान==
==प्रतिष्ठान==

२१:२४, १ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

काका गाडगीळ

नरहर विष्णु ऊर्फ काकासाहेब गाडगीळ (जानेवारी १०, इ.स. १८९६ - जानेवारी १२, इ.स. १९६६) हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारागृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली.

जन्म आणि शिक्षण

काकासाहेब गाडगिळांचा जन्म राजस्थानमधील मल्हारगढ येथे झाला. त्यांचे शिक्षण मल्हारगढ, पुणे, बडोदे आणि मुंबई येथे झाले. बी ए. एल्‌एल्.बी. झाल्यावर त्यांनी पुण्यात वकिली केली. १९२०मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले. ते भारताच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्यांचे मंत्री होते.

राजकीय आणि सामाजिक कारकीर्द

  • काकासाहेब गाडगीळांनी व मामा देवगिरीकरांनी मिळून पुणे शहरात हिंदीचा प्रचार करणार्‍या महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा या संस्थेची १९४५ साली स्थापना केली.
  • पंजाबचे राज्यपाल (१९५८ - १९६२)
  • पुणे जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणी्सपद (१९२१ – १९२५)
  • पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद (१९६४पासून)
  • भारत सरकारमध्ये मंत्रिपद (१९३४ ते १९३७; १९४७ ते १९५२)
  • भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सभासद (१९५२ – ५४)
  • महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, प्रवक्ते (१९३७ ते १९४५)
  • राष्ट्रकुल परिषदेचे सदस्यत्व (१९५४ व १९६५)
  • वेतन-आयोगाचे सदस्यत्व (१९४६ व १९५२)
  • संस्थानांच्या अर्थविषयक प्रश्नांचा विचार करणारी समितीचे सदस्यत्व (१९५३)


न.वि. गाडगीळ

कार्यकाळ
१९५२ – १९५७
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
मागील प्रथम
पुढील नानासाहेब गोरे
मतदारसंघ पुणे (मध्य)

निवास पुणे


लेखन

राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास इ. विषयांवरील व इतर ललित स्वरूपाची त्यांची ग्रंथनिर्मिती सुमारे पंचवीसहून अधिक आहे. विविध विषयांवरील त्यांची पुस्तके विचारप्रवर्तक आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र हे १९४३ मधील पुस्तक अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा उल्लेखनीय ग्रंथ होय. त्यांच्या अनेक ग्रंथांचे अनुवाद गुजराती, हिंदी, पंजाबी व कन्नड भाषांत झालेले आहेत. गाडगीळांची शैली खास मराठी आहे.

प्रकाशित साहित्य

  • अनगड मोती (ललित लेख)
  • आधुनिक राज्य व स्वातंत्र्य (१९६२)
  • The collected works of Kakasaheb Gadgil
  • कायदेमंडळातील सहा वर्षे
  • काही मोहरा काही मोती (आपल्या समकालीन राजकीय नेत्यांची व्यक्तिचित्रे)
  • गव्हर्नर्मेंट फ्रॉम इनसाइड (इंग्लिश) (Government From Inside) (पहिली आवृत्ती १९८८, तीन भाषांत अनुवाद)
  • ग्यानबाचे अर्थशास्त्र (आर्य चाणक्याच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद, १९४३)
  • चॉकलेटची वडी (१९६७)
  • पथिक (दोन भागातील आत्मचरित्र, १९६४-६५)
  • माझा येळकोट (ललित लेख, १९६१)
  • माझे समकालीन (आपल्या समकालीन राजकीय नेत्यांची व्यक्तिचित्रे, १९५९)
  • मुठा ते मेन (त्या काळच्या जर्मनीचे दर्शन, १९६५)
  • राज्यशास्त्रविचार (१९४५)
  • लाल किल्ल्याच्या छायेत (ललित लेख, १९६४)
  • वक्तृत्वशास्त्र (१९५८)
  • Vaḍī dhārāsabhāmāṃ cha varsha (?)
  • War and Indian economic policy (सहलेखक डी.आर. सोहनी, १९४४)
  • विधिशास्त्रविचार (१९५८)
  • शीखांचा इतिहास (१९६३)
  • शुभ शास्त्र
  • सत्तरीतले काका (१९६५)
  • सभाशास्त्र (१९४७)
  • समग्र काका (अनेक, किमान १८ खंड).
  • सालगुदस्त
  • स्मृति-शेष (१९५८)
  • हिंदी अंदाजपत्रके (१९४२)

गौरव

  • पुण्यात न.वि. गाडगीळ यांच्या नावाचा नदी-पूल आहे.
  • पुण्यातील शनिवारवाड्याजवळ काकासाहेब गाडगिळांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
  • मुंबईत दादर पश्चिम येथे काकासाहेब गाडगीळ मार्ग आहे. या मार्गावरील टिळक भवन या इमारतीत काँग्रेसचे कार्यालय आहे.

प्रतिष्ठान

काकासाहेब गाडगीळ यांच्या संबंधीची पुस्तके

  • काका गाडगिळांच्या ८१व्या जयंतीच्या निमित्ताने १९७७ साली एक स्मरणिका प्रकाशित केली होती. स्मरणिकेतले लेखक - निळूभाऊ लिमये, प्रसन्‍नकुमार अभ्यंकर, गो.कृ. पटवर्धन
  • श्री काकासाहेब गाडगीळ : चरित्र (लेखक V S Apte ?) (१९६७)
  • काकासाहेब गाडगीळ (चरित्र, अरुण साधू)
  • काकासाहेब गाडगीळ : जन्मशताब्दी ग्रंथ (संपादक - रवींद्र कुमार)
  • सह्याद्रीची शिखरे (लेखक - अनंत हरी लिमये, र.पु. परांजपे, दत्तो वामन पोतदार)
  • महान व्यक्तित्वे : भाग १० (बालवाङ्‌मय) (मूळ इंग्रजी - Remembering our Leaders, volume 10)