वर्ग:१ ली लोकसभा सदस्य
Appearance
भारतात पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान इ.स. १९५२ मध्ये पार पडले.पहिल्या लोकसभेत एकूण ४९४ सदस्य होते. पहिल्या लोकसभेचा कार्यकाल एप्रिल १७, इ.स. १९५२ ते एप्रिल ४, इ.स. १९५७ होता.
ग.वा. मावळणकर हे मे १५, इ.स. १९५२ ते फेब्रुवारी २७, इ.स. १९५६ या काळात तर अनंतशयनम अय्यंगार हे एप्रिल ८, इ.स. १९५६ ते एप्रिल १६, इ.स. १९५७ या काळात पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते. तसेच अनंतशयनम अय्यंगार हे मे ३०, इ.स. १९५२ ते मार्च ७, इ.स. १९५६ या काळात आणि सरदार हुकूमसिंह हे मार्च २०, इ.स. १९५६ ते एप्रिल ४, इ.स. १९५७ या काळात पहिल्या लोकसभेचे उपाध्यक्ष होते.
पहिल्या लोकसभेच्या कार्यकाळात जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते.
"१ ली लोकसभा सदस्य" वर्गातील लेख
एकूण ८५ पैकी खालील ८५ पाने या वर्गात आहेत.