Jump to content

"गो.नी. दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५२: ओळ ५२:


==स्मृतिपुरस्कार==
==स्मृतिपुरस्कार==

गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्‍नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. यंदाच्या सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. [[मीना प्रभू]] या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफोर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत.
गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्‍नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. यंदाच्या सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. [[मीना प्रभू]] या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफोर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत.


===साहित्य===
===साहित्य===
====कादंबरी====


===कथा===
{| class="wikitable" width="50%"
* आईची देणगी

====कादंबरी====
{| class="wikitable" width="100%"
|-
|-
| [[आम्ही भगीरथाचे पुत्र]]||[[कृष्णवेध]] || [[जैत रे जैत]] || [[तांबडफुटी]] || [[पडघवली]]
| [[आम्ही भगीरथाचे पुत्र]]||[[कृष्णवेध]] || [[जैत रे जैत]] || [[तांबडफुटी]] || [[पडघवली]]
ओळ ८३: ओळ ८५:


====प्रवास आणि स्थळवर्णन====
====प्रवास आणि स्थळवर्णन====
{| class="wikitable" width="50%"
{| class="wikitable" width="100%"
|-
|-
| [[दुर्ग|किल्ले]]|| [[कुणा एकाची भ्रमणगाथा]] ||[[गगनात घुमविली जयगाथा]]
| [[महाराष्ट्र दर्शन]] || [[दुर्ग दर्शन]] || [[दुर्ग|किल्ले]]
|-
|-
|गोनीदांची दुर्गचित्रे (संकलन-संपादन वीणा देव)|| [[दुर्ग दर्शन]] || [[दुर्गभ्रमणगाथा]]
| [[मावळतीचे गहिरे रंग]] || [[निसर्गशिल्प]] [[शिवतीर्थ रायगड]]
|-
|-
|नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा || [[निसर्गशिल्प]] || [[महाराष्ट्र दर्शन]]
|[[दुर्गभ्रमणगाथा]] || [[गगनात घुमविली जयगाथा]] || नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा
|-
|-
|[[मावळतीचे गहिरे रंग]] || [[शिवतीर्थ रायगड]]
|[[कुणा एकाची भ्रमणगाथा]]
|}
|}


====धार्मिक आणि पौराणिक====
====धार्मिक आणि पौराणिक====
{| class="wikitable" width="50%"
{| class="wikitable" width="100%"
|-
|-
| [[श्रीरामायण]] || [[श्रीकृष्णगायन]] || [[भावार्थ ज्ञानेश्वरी]] || [[गणेशायन]]
| [[श्रीरामायण]] || [[श्रीकृष्णगायन]] || [[भावार्थ ज्ञानेश्वरी]] || [[गणेशायन]]
ओळ १०१: ओळ १०३:


====कुमारसाहित्य====
====कुमारसाहित्य====
{| class="wikitable" width="50%"
{| class="wikitable" width="100%"
|-
|-
| [[आपट्यांचा सदू]] || [[गोपाळांचा मेळा]] || [[शुभंकरोती, कादंबरी|शुभंकरोती]]
| [[आपट्यांचा सदू]] || [[गोपाळांचा मेळा]] || [[शुभंकरोती, कादंबरी|शुभंकरोती]]
ओळ १११: ओळ ११३:
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[अकोला]], १९८१
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[अकोला]], १९८१
===पुरस्कार===
===पुरस्कार===
{| class="wikitable" width="50%"
{| class="wikitable" width="100%"
|-
|-
| [[साहित्य अकादमी पुरस्कार]] १९७६ 'स्मरणगाथा' साठी|| [[महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार]] || [[महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार]]
| [[साहित्य अकादमी पुरस्कार]] १९७६ 'स्मरणगाथा' साठी|| [[महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार]] || [[महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार]]

२२:२८, २१ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती


गो.नी. दांडेकर
जन्म नाव गोपाल नीलकंठ दांडेकर
टोपणनाव गो.नी.दा.
जन्म जुलै ८, १९१६
परतवाडा
मृत्यू जून १, १९९८
पुणे
कार्यक्षेत्र कादंबरीकार, ललितलेखक
साहित्य प्रकार कादंबरी, ललित वाङमय,
कुमार वाङमय, चरित्र, प्रवासवर्णन
वडील नीलकंठ दांडेकर
अपत्ये वीणा देव
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार
महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार
महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
महाराष्ट्र गौरव पुरस्कार -१९९०
जिजामाता पुरस्कार -१९९०
केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (जुलै ८, १९१६ - जून १, १९९८) हे एक अनुभवसंपन्न,सृजनशील,रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते.तसेच गो.नी.दा.परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.

जीवनप्रवास

गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी ते गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.

त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.

१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव (डॉ.वीणा विजय देव)] ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.

गो.नी.दां.चं दुर्गप्रेम

गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे.हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीनं जागवलं. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचं हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसं दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली.त्यातल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवलं.'किल्ले' हे त्यांचं छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचं स्थान मिळवून आहे.'पवनाकाठचा धोंडी','जैत रे जैत','रानभुली','त्या तिथे रुखातळी','वाघरू', आणि 'माचीवरला बुधा' या त्यांच्या कादंबऱ्यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवलं आहे.

स्मृतिपुरस्कार

गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्‍नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. यंदाच्या सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफोर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत.

साहित्य

कथा

  • आईची देणगी

कादंबरी

आम्ही भगीरथाचे पुत्र कृष्णवेध जैत रे जैत तांबडफुटी पडघवली
पद्मा पवनाकाठचा धोंडी पूर्णामायची लेकरं बिंदूची कथा माचीवरला बुधा
मृण्मयी शितू सिंधुकन्या वाघरू

ललित

चरित्र, आत्मचरित्र

ऐतिहासिक

प्रवास आणि स्थळवर्णन

किल्ले कुणा एकाची भ्रमणगाथा गगनात घुमविली जयगाथा
गोनीदांची दुर्गचित्रे (संकलन-संपादन वीणा देव) दुर्ग दर्शन दुर्गभ्रमणगाथा
नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा निसर्गशिल्प महाराष्ट्र दर्शन
मावळतीचे गहिरे रंग शिवतीर्थ रायगड

धार्मिक आणि पौराणिक

श्रीरामायण श्रीकृष्णगायन भावार्थ ज्ञानेश्वरी गणेशायन

कुमारसाहित्य

आपट्यांचा सदू गोपाळांचा मेळा शुभंकरोती
रक्षाबंधन व्रतसाधना भिल्लवीर कलिंग

गौरव

पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार १९७६ 'स्मरणगाथा' साठी महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
महाराष्ट्र गौरव पुरस्कार -१९९० जिजामाता पुरस्कार -१९९० केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

बाह्य दुवे