Jump to content

"गो.नी. दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ४४: ओळ ४४:


===जीवनप्रवास===
===जीवनप्रवास===
गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी ते गावोगाव हिंडले. नंतर गोनीदानी वेदांन्ताचा अभ्यास करणे सुरू केले.. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.
गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी ते गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.


त्यांच्या [[पडघवली]] आणि [[शितू]] ह्या कादंबर्‍या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे [[दुर्गभ्रमणगाथा]] हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.
त्यांच्या [[पडघवली]] आणि [[शितू]] ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे [[दुर्गभ्रमणगाथा]] हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.


१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी [[वीणा देव]] (डॉ.वीणा विजय देव)] ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव सुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.
१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी [[वीणा देव]] (डॉ.वीणा विजय देव)] ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.

गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे.


==स्मृतिपुरस्कार==
==स्मृतिपुरस्कार==

२३:३०, २३ जून २०१२ ची आवृत्ती


गो.नी. दांडेकर
जन्म नाव गोपाल नीलकंठ दांडेकर
टोपणनाव गो.नी.दा.
जन्म जुलै ८, १९१६
परतवाडा
मृत्यू जून १, १९९८
पुणे
कार्यक्षेत्र कादंबरीकार, ललितलेखक
साहित्य प्रकार कादंबरी, ललित वाङमय,
कुमार वाङमय, चरित्र, प्रवासवर्णन
वडील नीलकंठ दांडेकर
अपत्ये वीणा देव
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार
महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार
महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
महाराष्ट्र गौरव पुरस्कार -१९९०
जिजामाता पुरस्कार -१९९०
केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (जुलै ८, १९१६ - जून १, १९९८) हे मराठी भाषेतील लेखक होते.

जीवनप्रवास

गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी ते गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.

त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.

१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव (डॉ.वीणा विजय देव)] ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.

गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे.

स्मृतिपुरस्कार

श्री. गो. नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. यंदाच्या सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफोर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत.

साहित्य

कादंबरी

पडघवली शितू मृण्मयी पद्मा आम्ही भगीरथाचे पुत्र
सिंधू कन्या बिंदूची कथा वाघरू तांबडफुटी कृष्णवेध

ललित

चरित्र, आत्मचरित्र

प्रवास आणि स्थळवर्णन

महाराष्ट्र दर्शन दुर्ग दर्शन किल्ले
मावळतीचे गहीरे रंग निसर्गशिल्प शिवतीर्थ रायगड
दुर्गभ्रमणगाथा गगनात घुमविली जयगाथा

धार्मिक आणि पौराणिक

श्रीरामायण श्रीकृष्णगायन भावार्थ ज्ञानेश्वरी गणेशायन

कुमारसाहित्य

आपट्यांचा सदू गोपाळांचा मेळा शुभंकरोती
रक्षाबंधन व्रतसाधना भिल्लवीर कलिंग

गौरव

पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार १९७६ 'स्मरणगाथा' साठी महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
महाराष्ट्र गौरव पुरस्कार -१९९० जिजामाता पुरस्कार -१९९० केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

बाह्य दुवे