Jump to content

फ्रांसिस दि'ब्रिटो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रान्सिस दिब्रिटो या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्रांसिस दि'ब्रिटो

फादर फ्रान्सिस दिब्रिटो (४ डिसेंबर, इ.स. १९४३[१]; नंदाखाल, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक आहेत. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे.

जीवन[संपादन]

दिब्रिटोंचा जन्म ४ डिसेंबर, इ.स. १९४२ रोजी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो इ.स. १९८३ ते इ.स. २००७ या कालखंडात सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. त्यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कुलात झाले. इ.स. १९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले आहे.

कार्य[संपादन]

फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी आहे. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. ’हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली.

संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केले होते.[२].

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

 • आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
 • ओअ‍ॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव, मूळ - दैनिकातील सदर). इंग्रजी रूपांतर 'इन सर्च ऑफ दि ओॲसिस'; अनुवादक - फ्रान्सिस दिब्रिटो+रेमंड मच्याडो)
 • ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)
 • ख्रिस्ती सण आणि उत्सव
 • तेजाची पाऊले (ललित)
 • नाही मी एकला (आत्मकथन)
 • संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
 • सुबोध बायबल - नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद) (पृष्ठसंख्या - ११२५)
 • सृजनाचा मळा
 • सृजनाचा मोहोर
 • परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)
 • मुलांचे बायबल (चरित्र)

सन्मान[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ सिसिलिया कार्व्हालो. "कृतिशील समाजचिंतक: फादर दिब्रिटो". २४ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "सृजनाचा मोहोर".[मृत दुवा]