वसई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वसई (Vasai, Bassein or Baçaim) हे भारतातील मुंबई शहराचे पालघर जिल्ह्यात असलेले एक उपनगर आहे. याला जवळचे रेल्वे स्थानक हे वसई रोड आहे. वसई शहर हे आधुनिक वसई-विरार महापालिकेत येते. रेल्वे स्टेशन असलेल्या भागाचे नाव नवघर आहे.

वसई या शहरात पापडी ,बाभोळा ,देवतलाव ,गिरिज ,हिराडोंगरी ,गास , भूईगाव ,रानगाव ,रमेदी ,होळी अशी अनेक गावे येतात या शहराजवळ नायगाव आणि वसई ही दोन रेल्वे स्थानके आहेत. या शहरात हिंदु आणि ख्रिस्ती ह्या धर्मीय समाज हा अधिक आहे तसेच इतर धर्मीय देखील इथे बऱ्याच प्रमाणात आहेत. वसई मध्ये खालील गोष्टी विशेष आहेत किल्ला पुरातन धार्मिक स्थळ समुद्र किनारा. हे शहर मुंबईजवळचे शहर आहे वसई ची सुकेळी हि फार प्रसिद्ध होतीतशी आज ही प्रसिद्ध आहेत पण कालांतराने बागा कमी झाल्या आहेत .

पोर्तुगीजांनी येथे अरबी समुद्रालगत आरमारी किल्ला बांधला. सन १७३९मध्ये पेशव्यांचे सेनापती चिमाजी अप्पा याने तीन वर्षे लढाई करून हा किल्ला जिंकला, व मराठ्यांच्या राज्यास जोडला.

व्युत्पत्तिशास्त्र[संपादन]

संस्कृत मध्ये वसई शब्दाचे नाव वास असे आहे ज्याचा अर्थ निवास असा होतो. या प्रदेशातील  सर्वात जुने नाव व्हेसेले (लॅटिनिज्ड स्पेलिंग) आहे.

किल्ला[संपादन]