इ.स. २०२४
Appearance
| सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
| शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
| दशके: | २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे - २०४० चे |
| वर्षे: | २०२१ - २०२२ - २०२३ - २०२४ - २०२५ - २०२६ - २०२७ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०२४ हे इसवी सनामधील २०२४ वे, २१व्या शतकामधील २४वे तर २०२० च्या दशकामधील पाचवे वर्ष आहे.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी
[संपादन]- जानेवारी ११ - आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे बाबासाहेब आंबेडकर यांचा २०६ फूट उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस उभारण्यात आला.[१]
मे
[संपादन]- मे २४ - पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनात ७००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.[२]
- मे २५ - गुजरातच्या राजकोट शहरातील गेमझोन या करमणूक केन्द्रात लागलेल्या आगीत होरपळून ३३ मृत्युमुखी.[३]
जून
[संपादन]- जून १२ - कुवेतच्या अहमदी प्रांतात लागलेल्या आगीत ४६ भारतीयांसह ५० व्यक्ती मृत्युमुखी.[४]
डिसेंबर
[संपादन]- डिसेंबर ७ - सिरियामध्ये बंडखोरांनी दमास्कसवर चाल करून शहर काबीज केल्यावर राष्ट्राध्यक्ष बशर अल असादने मॉस्कोला पळ काढला. तेथे व्लादिमिर पुतिनच्या सरकारने त्याला राजकीय आश्रय दिला.[५]
- डिसेंबर १८ - नौदलाच्या स्पीडबोट व घारापुरीच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल ह्या लॉंचच्या धडकेत १३ प्रवासी मृत्युमुखी व ५ जण बेपत्ता. एकूण ९९ जणांना वाचवण्यात आले. प्रवासी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते.[६]
मृत्यू
[संपादन]जानेवारी
[संपादन]- जानेवारी १३ - प्रभा अत्रे, पद्मविभूषण पुरस्कारविजेत्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका (जन्म: १९३२)
फेब्रुवारी
[संपादन]- फेब्रुवारी २० - अमीन सयाणी, प्रसिद्ध रेडिओ निवेदक व 'बिनॉका गीतमाला'चे सूत्रसंचालक (जन्म: १९३२)
- फेब्रुवारी २३ - मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष (जन्म: १९३७)
- फेब्रुवारी २६ - पंकज उधास, पद्मश्री पुरस्कारविजेते प्रसिद्ध गझल गायक (जन्म: १९५१)
ऑक्टोबर
[संपादन]- ऑक्टोबर ९ - रतन टाटा, पद्मविभूषण सन्मानित उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष (जन्म: १९३७)
- ऑक्टोबर १२ - बाबा सिद्दीकी, महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री व आमदार (जन्म: १९५७)
- ऑक्टोबर १४ - अतुल परचुरे, प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिका अभिनेते (जन्म: १९६६)
संदर्भ
[संपादन]| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- ↑ "विजयवाडा येथे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिसचे अनावरण". द हिंदू. 2024-01-11.
- ↑ "पापुआ न्यू गिनी भूस्खलनात ७०० हून अधिक ठार". बीबीसी न्यूझ. 2024-05-24.
- ↑ "राजकोट गेमझोनमध्ये भीषण आग, ३३ जणांचा मृत्यू". लोकसत्ता. 2024-05-25.
- ↑ "कुवेत इमारतीतील आगीत ४६ भारतीयांचा मृत्यू". महाराष्ट्र टाईम्स. 2024-06-12. 2026-08-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-08-19 रोजी पाहिले.
- ↑ "बशर अल असाद यांनी सिरिया सोडला, रशियात आश्रय". रॉयटर्स. 2024-12-07.
- ↑ "घारापुरी जवळ बोट दुर्घटना, १३ जणांचा मृत्यू". सकाळ. 2024-12-18.
