जुलै २५
Appearance
(२५ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०६ वा किंवा लीप वर्षात २०७ वा दिवस असतो.
ठळक घटना व घडामोडी
[संपादन]चौथे शतक
[संपादन]- ३०६ - कॉन्स्टॅटाईन पहिला रोमन सम्राटपदी.
नववे शतक
[संपादन]- ८६४ - इंग्लंडचा राजा टकल्या चार्ल्सने व्हाईकिंग लुटारूंपासुन संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यास सुरुवात केली.
सोळावे शतक
[संपादन]- १५४७ - हेन्री दुसरा फ्रांसच्या राजेपदी.
- १५९३ - फ्रांसचा राजा हेन्री चौथ्याने जाहीररीत्या कॅथोलिक धर्म स्वीकारला.
अठरावे शतक
[संपादन]- १७९७ - स्पेनच्या तेनेरीफ द्वीपांवरील हल्ल्यात होरेशियो नेल्सनने ३०० सैनिक व स्वतःचा उजवा हात गमावला.
- १७९९ - नेपोलियन बोनापार्टने ईजिप्तमधील अबु किर जवळ ओट्टोमन सैन्याचा पराभव केला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकन काँग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे.
- १८६८ - वायोमिंगला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १८९४ - पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
- १८९८ - अमेरिकेने पोर्तोरिकोवर आक्रमण केले.
विसावे शतक
[संपादन]- १९०७ - कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले.
- १९०८ - किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला.
- १९०९ - लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
- १९१७ - कॅनडात आयकर लागू
- १९२५ - सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना.
- १९३४ - ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-ऑपरेशन स्प्रिंग - तुंबळ युद्धात ५,०२१ ठार, १३,०००पेक्षा जास्त जखमी.
- १९५२ - पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले.
- १९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
- १९५६ - नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. अँड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. अँड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
- १९७३ - सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित.
- १९७८ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊनचा इंग्लंडमधील लॅंकेशायर येथे जन्म.
- १९८४ - सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
- १९९४ - इस्रायेल व जॉर्डनमधले १९४८पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
- १९९५ - पॅरिसच्या उपनगरी रेल्वेत स्फोट. ८ ठार, ८० जखमी.
- १९९७ - के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९९ - लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० - एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉॅंकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
- २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.
जन्म
[संपादन]- ११०९ - अफोन्सो पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १५६२ - केटो कियोमासा, जपानी सामुराई.
- १८४८ - आर्थर बॅलफोर, युनायटेड किंग्डमचा ३३वा पंतप्रधान.
- १९०८ - बिल बोव्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२९ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी.
- १९७८ - लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी
मृत्यू
[संपादन]- ३०६ - कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट.
- १४०९ - मार्टिन पहिला, सिसिलीचा राजा.
- १४९२ - पोप इनोसंट आठवा.
- १९३४ - एंगेलबर्ट डॉलफस, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- १९७३ - लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- गॅलिशिया दिन - गॅलिशिया(स्पेन).
- संविधान दिन - पोर्तोरिको.
- प्रजासत्ताक दिन - ट्युनिसीया.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै २५ - जुलै २६ - जुलै २७ - जुलै महिना