संदीप तापकीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संदीप भानुदास तापकीर हे मराठी लेखक असून 'दुर्गांच्या देशातून' ह्या मराठी दिवाळी अंकाचे संपादक आहेत.


संदीप तापकीर
संदीप तापकीर
जन्म नाव संदीप भानुदास तापकीर
जन्म १४ जून इ.स. १९७९
चर्‍होली
शिक्षण एम.ए.(इतिहास)
एम.ए.(मराठी)
बी.सी.जे
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
भाषा मराठी
वडील भानुदास लक्ष्मण तापकीर
आई शांताबाई भानुदास तापकीर

शिक्षण व कार्य[संपादन]

संदीप तापकीर यांनी पुणे येथील स.प.महाविद्यालयातून बी.ए.चे पदवी तर पुणे विद्यापीठात इतिहास ह्या विषयातून एम.ए.चे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. नंतर पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचे लेखनिक म्हणून (१९९९-२००२) त्यांनी काम केले. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी ह्या विषयातून एम.ए. ही पदवी त्यांनी प्राप्त केली.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘मराठी शब्दकोश’ या प्रकल्पावर ते २००७ ते २०१२ सहाय्यक संपादक कार्यरत होते. मराठी शब्दकोशाचे खंड ४, ५ व ६ या तीन खंडांचे सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर काही वर्ष ते लोकमत ह्या वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात कार्यरत होते. सध्या ते विश्वकर्मा प्रकाशन पुणे येथे सहसंपादक आहेत.[१]
महाराष्ट्रातील ४०० पेक्षा अधिक किल्ले त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहिले असून ह्या किल्ल्यांवर जिल्हावार पुस्तक लेखनाचा त्यांचा प्रकल्प सुरु आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी ह्या जिल्हातील किल्ल्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. किल्ले ह्या विषयावर इतरांनाही लिहीते करुन त्यांनी २०१२ साली दुर्गांच्या देशातून.. हा दिवाळी अंक सुरू केला. ह्या अंकाचे २०१२ ते २०२० पर्यंत ९ अंक प्रकाशित झाले आहेत. ह्या अंकाला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.[२]

वाङ्मय[संपादन]

ग्रंथलेखन[संपादन]

 • महाराजांच्या जहागिरीतून... पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले (प्रकाशक - गरुडझेप प्रकाशन) , २०१२
 • वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०१८
 • अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे), २०१९
 • चला आळंदीला जाऊ । ज्ञानेश्वर डोळा पाहू । (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०१९
 • रायगड : राजधानी स्वराज्याची (सहलेखक - शिवप्रसाद मंत्री , प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे ) , २०१९
 • छत्रपती श्री शिवराय (प्रकाशक - सरस्वती प्रकाशन) , २०१९
 • महाराष्ट्राची दुर्गपंढरी : नाशिक जिल्ह्यातील किल्ले (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०२१

संपादित साहित्य[संपादन]

 • मैत्रेय (कृष्णकांत कुदळे गौरव अंक) , २००२
 • आत्मानंद ( प्रमोद बेल्हेकर गौरव अंक) , २००४
 • मराठी शब्दकोश खंड ४ (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) , २०१०
 • मराठी शब्दकोश खंड ५ (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) , २०११
 • मराठी शब्दकोश खंड ६ (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) , २०१२
 • दुर्गसंवर्धनाची पहाट...(सहसंपादक - गणेश खंडाळे , मंगेश निरवणे ) , २०१२
 • महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २ - चिं.गं.गोगटे (सहसंपादक - अंकुर काळे, संतोष जाधव), २०१९

दिवाळी अंक[संपादन]

दुर्गाच्या देशातून (संदीप तापकीर यांनी किल्ले ह्या विषयावरील मराठी भाषेतील पहिला दिवाळी २०१२ साली सुरु केला. ते या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक असून, २०१२ पासून २०२० पर्यंत ह्या दिवाळी अंकाचे ९ अंक प्रकाशित झाले आहेत.)[३]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Sandip Tapkir Archive".
 2. ^ तापकीर, संदीप (२०१८). वाटा दुर्गभ्रमणाच्या. विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे. pp. Page 223, 224. ISBN 978-93-86455-47-5.
 3. ^ तापकीर, संदीप (२०१८). वाटा दुर्गभ्रमणाच्या. विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे. pp. Page 223, 224.