Jump to content

चऱ्होली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चऱ्होली हे पुण्याजवळ असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील इसवी सनाच्या बाराव्या शतकाचा आधीपासून अस्तित्वात असलेले एक गाव आहे.

या गावाचे ग्रामदैवत असलेल्या वाघेश्वर मंदिरातील शिलालेखावरून हे देऊळ देवगिरीच्या यादव राजांच्या काळात बांधल्याचे समजते. स्वकाम सेवा मंडळ नावाच्या संस्थेकडून मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे.

चऱ्होली गाव इ.स. १९९६ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाले. पूर्वी ह्या गावाला संपूर्ण तटबंदी होती, आता फक्त एक दगडी कमान शिल्लक आहे.

वाघेश्वर मंदिराच्या परिसरातच शिवसृष्टी साकारली जात आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा १६ फुटी अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे.

चऱ्होली गावाच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी चंद्राकार वाहत येते. गावाच्या आजूबाजूला टेकड्या आहेत. गावाच्या आसपास भाजीपाला, फळे यांची शेती आहे. गावातील मंदिरे लक्षवेधी नक्षीकाम असलेली आहेत.

निवृत्तिनाथी ज्ञानेश्वर भावंडांचा सहवास कधीकाळी या गावाला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यनिष्ठ,शुर,पराक्रमी सरदार:-(दुळबाजी तापकीर सरकार)व तापकीर सरदार घराणे,दाभाडे सरकार आणि देशमुख सरकार हे या गावचे रहिवासी आहेत.

गावात वाघेश्वर विद्यालय नावाची शाळा असून डी.वाय.पाटील शिक्षणसंस्थेसारखेच एक विद्यासंकुल आहे.

भौगोलिक वैशिष्ट्य

[संपादन]

येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार दिनांक २२ जून २०२४