संदीप तापकीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदीप भानुदास तापकीर हे मराठी लेखक, व्याख्याते, इतिहास अभ्यासक असून 'दुर्गांच्या देशातून' या मराठी दिवाळी अंकाचे संपादक आहेत.


संदीप तापकीर
संदीप तापकीर
जन्म नाव संदीप भानुदास तापकीर
जन्म १४ जून इ.स. १९७९
चऱ्होली
शिक्षण एम.ए.(इतिहास)
एम.ए.(मराठी)
बी.सी.जे
एम.फिल्.
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
भाषा मराठी
वडील भानुदास लक्ष्मण तापकीर
आई शांताबाई भानुदास तापकीर

शिक्षण व कार्य[संपादन]

संदीप तापकीर यांनी पुणे येथील स.प.महाविद्यालयातून बी.ए.चे पदवी तर पुणे विद्यापीठात इतिहास ह्या विषयातून एम.ए.चे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. नंतर पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचे लेखनिक म्हणून (१९९९-२००२) त्यांनी काम केले. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी ह्या विषयातून एम.ए. ही पदवी त्यांनी प्राप्त केली.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘मराठी शब्दकोश’ या प्रकल्पावर ते २००७ ते २०१२ सहाय्यक संपादक कार्यरत होते. मराठी शब्दकोशाचे खंड ४, ५ व ६ या तीन खंडांचे सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर काही वर्ष ते लोकमत ह्या वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात कार्यरत होते. सध्या ते विश्वकर्मा प्रकाशन पुणे येथे सहसंपादक पदावर कार्यरत आहेत.[१]
महाराष्ट्रातील ४०० पेक्षा अधिक किल्ले त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहिले असून ह्या किल्ल्यांवर जिल्हावार पुस्तक लेखनाचा त्यांचा प्रकल्प सुरू आहे. पुणे, सातारा, रत्‍नागिरी ह्या जिल्हातील किल्ल्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. किल्ले ह्या विषयावर इतरांनाही लिहीते करून त्यांनी २०१२ साली दुर्गांच्या देशातून.. हा दिवाळी अंक सुरू केला. ह्या अंकाचे २०१२ ते २०२० पर्यंत ९ अंक प्रकाशित झाले आहेत. ह्या अंकाला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.[२]

वाङ्मय[संपादन]

ग्रंथलेखन[संपादन]

  • महाराजांच्या जहागिरीतून... पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले (प्रकाशक - गरुडझेप प्रकाशन) , २०१२ , २०२२
  • वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०१८
  • अपरिचित दुर्गांची सफर : रत्‍नागिरी जिल्ह्यातील किल्ले (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे), २०१९
  • चला आळंदीला जाऊ । ज्ञानेश्वर डोळा पाहू । (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०१९
  • रायगड : राजधानी स्वराज्याची (सहलेखक - शिवप्रसाद मंत्री , प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे ) , २०१९
  • छत्रपती श्री शिवराय (प्रकाशक - सरस्वती प्रकाशन) , २०१९
  • महाराष्ट्राची दुर्गपंढरी : नाशिक जिल्ह्यातील किल्ले (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०२१
  • निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट , (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०२२
  • राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल (सहलेखक - पंकज रुपचंद पाटील) , (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०२३
  • रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले , (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०२३
  • मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले , (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०२३

अनुवादित ग्रंथ[संपादन]

  • छत्रपति श्री शिवाजी - हिंदी अनुवाद : शशि निघोजकर (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०२३
  • Chhatrapati Shree Shivaji - English Translation by Surashree Joshi (Vishwakarma Publications, Pune) , 2023

संपादित साहित्य[संपादन]

  • मैत्रेय (कृष्णकांत कुदळे गौरव अंक) , २००२
  • आत्मानंद (प्रमोद बेल्हेकर गौरव अंक) , २००४
  • मराठी शब्दकोश खंड ४ (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) , २०१०
  • मराठी शब्दकोश खंड ५ (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) , २०११
  • मराठी शब्दकोश खंड ६ (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) , २०१२
  • दुर्गसंवर्धनाची पहाट...(सहसंपादक - गणेश खंडाळे , मंगेश निरवणे ) , २०१२
  • महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २ - चिं.गं.गोगटे (सहसंपादक - अंकुर काळे, संतोष जाधव), २०१९
  • अरुणगंध : अरुण बोऱ्हाडे यांच्या साहित्यिक, सामाजिक, कामगार व राजकीय कार्यकर्तृत्वाचा आढावा (प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स , पुणे) , २०२२
  • कर्मयोगी: के.के.निकम सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा गौरव ग्रंथ (सहसंपादक - देवदत्त जयवंत निकम) , (प्रकाशक - देवदत्त जयवंत निकम) , २०२३

दिवाळी अंक[संपादन]

दुर्गाच्या देशातून (संदीप तापकीर यांनी किल्ले या विषयावरील मराठी भाषेतील पहिला दिवाळी २०१२ साली सुरू केला. ते या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक असून, २०१२ पासून २०२२ पर्यंत या दिवाळी अंकाचे ११ अंक प्रकाशित झाले आहेत.)[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sandeep Tapkir Archive".
  2. ^ तापकीर, संदीप (२०१८). वाटा दुर्गभ्रमणाच्या. विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे. pp. Page 223, 224. ISBN 978-93-86455-47-5.
  3. ^ तापकीर, संदीप (२०१८). वाटा दुर्गभ्रमणाच्या. विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे. pp. Page 223, 224.