Jump to content

"फ्रांसिस दि'ब्रिटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ६१: ओळ ६१:
* ’सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
* ’सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
* प्राचार्य [[शिवाजीराव भोसले]] स्मृती सन्मान (१४-७-२०१७)
* प्राचार्य [[शिवाजीराव भोसले]] स्मृती सन्मान (१४-७-२०१७)
* आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२२ सप्टेंबर २०१९ची बातमी)


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१४:३२, २२ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

फ्रांसिस दि'ब्रिटो

फादर फ्रान्सिस दिब्रिटो (४ डिसेंबर, इ.स. १९४३[]; नंदाखाल, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक आहेत. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे.

जीवन

दिब्रिटोंचा जन्म ४ डिसेंबर, इ.स. १९४२ रोजी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो इ.स. १९८३ ते इ.स. २००७ या कालखंडात सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते</ref name="कार्व्हालो">. त्यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कुलात झाले. इ.स. १९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले आहे.

कार्य

फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व आहे. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. ’हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनीपुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली.

संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केले होते.[].

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे प्रकाशित साहित्य

  • आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
  • ओअ‍ॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव)
  • तेजाची पाऊले (ललित)
  • नाही मी एकला
  • संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
  • सुबोध बायबल - नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)
  • सृजनाचा मोहोर
  • परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)
  • ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)
  • मुलांचे बायबल (चरित्र)
  • ख्रिस्ती सण आणि उत्सव
  • पोप दुसरे जॉन पॉल[]

सन्मान

  • फ्रान्सिस दिब्रिटो हे पुणे येथे झालेल्या १५व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • ’सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (१४-७-२०१७)
  • आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२२ सप्टेंबर २०१९ची बातमी)

संदर्भ

  1. ^ सिसिलिया कार्व्हालो. http://www.thinkmaharashtra.com/index.php?option=com_content&view=article&id=466:2011-05-16-12-02-29&catid=34:2010-01-04-06-48-18&Itemid=182. २४ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.loksatta.com/old/daily/20020714/lokdakal.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ शेजवलकर, प्र. चिं. (२०१३). यशोगाथा. पुणे: यशवंत पब्लिशिंग हाऊस. pp. ५६. ISBN 978-81-926412-2-5.