"नरहर रघुनाथ फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) छो added Category:इ.स. १९७९ मधील मृत्यू using HotCat |
No edit summary खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''नरहर रघुनाथ फाटक''' ([[एप्रिल १५]], [[इ.स. १८९३|१८९३]] - [[डिसेंबर २१]], [[इ.स. १९७९|१९७९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] |
'''नरहर रघुनाथ फाटक''' (जन्म : जांभळी(भोर संस्थान), [[एप्रिल १५]], [[इ.स. १८९३|१८९३]] - मृत्यू : मुंबई, [[डिसेंबर २१]], [[इ.स. १९७९|१९७९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. [[हैदराबाद]] येथे [[इ.स. १९४७|१९४७]] साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. |
||
न.र. फाटक यांचे शिक्षण भोर, [[पुणे]], [[अजमेर]], [[इंदूर]] आणि [[अलाहाबाद]] ह्या ठिकाणी झाले. १९१७ साली [[अलाहाबाद]] विद्यापीठातून ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए. झाले. त्यानंतर काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवा काळ ह्या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. सत्यान्वेषी आणि फरिश्ता ह्या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लेखन केले आणि आपल्या निर्भीड पत्रकारीचा ठसा उमटविला. १९३५ -३७ ह्या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठात आणि त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. ह्याच कॉलेजातून १९५७ साली ते सेवानिवृत्त झाले. |
|||
मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ अशा विविध संस्थांचे ते सदस्य वा पदाधिकारी होते. |
|||
==न.र. फाटक यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी (१९५८) |
|||
* आदर्श भारत सेवक ([[गोपाळ कृष्ण गोखले]] यांचे चरित्र - १९६७) |
|||
* श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य (१९५०) |
|||
* नाट्याचार्य [[कृ.प्र. खाडिलकर]] (चरित्र) |
|||
* न्यायमूर्ति [[महादेव गोविंद रानडे]] (चरित्र - १९२४) |
|||
* मराठेशाहीचा अभ्यास (१९५०) |
|||
* मुंबई शहराचा इतिहास (अपूर्ण) |
|||
* यशवंतराव होळकर यांचे चरित्र |
|||
* [[रामदास]] : वाङ्मय आणि कार्य (१९५२) |
|||
* लोकमान्य (टिळकांचे चरित्र) |
|||
* [[ज्ञानेश्वर]] आणि [[ज्ञानेश्वरी]] (१९४८) |
|||
* [[ज्ञानेश्वर]] : वाङ्मय आणि कार्य (१९५२) |
|||
==पुरस्कार== |
|||
* साहित्य अकादमी पुरस्कार (१९७०) : ’आदर्श भारत सेवक’ या पुस्तकाला |
|||
००:०८, २४ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
नरहर रघुनाथ फाटक (जन्म : जांभळी(भोर संस्थान), एप्रिल १५, १८९३ - मृत्यू : मुंबई, डिसेंबर २१, १९७९) हे मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. हैदराबाद येथे १९४७ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
न.र. फाटक यांचे शिक्षण भोर, पुणे, अजमेर, इंदूर आणि अलाहाबाद ह्या ठिकाणी झाले. १९१७ साली अलाहाबाद विद्यापीठातून ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए. झाले. त्यानंतर काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवा काळ ह्या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. सत्यान्वेषी आणि फरिश्ता ह्या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लेखन केले आणि आपल्या निर्भीड पत्रकारीचा ठसा उमटविला. १९३५ -३७ ह्या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठात आणि त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. ह्याच कॉलेजातून १९५७ साली ते सेवानिवृत्त झाले.
मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ अशा विविध संस्थांचे ते सदस्य वा पदाधिकारी होते.
न.र. फाटक यांनी लिहिलेली पुस्तके
- अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी (१९५८)
- आदर्श भारत सेवक (गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र - १९६७)
- श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य (१९५०)
- नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकर (चरित्र)
- न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे (चरित्र - १९२४)
- मराठेशाहीचा अभ्यास (१९५०)
- मुंबई शहराचा इतिहास (अपूर्ण)
- यशवंतराव होळकर यांचे चरित्र
- रामदास : वाङ्मय आणि कार्य (१९५२)
- लोकमान्य (टिळकांचे चरित्र)
- ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (१९४८)
- ज्ञानेश्वर : वाङ्मय आणि कार्य (१९५२)
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार (१९७०) : ’आदर्श भारत सेवक’ या पुस्तकाला