डिसेंबर २१
Jump to navigation
Jump to search
<< | डिसेंबर २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ह्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातील अंतिम टोक गाठत असल्याने भारतीय सौर कॅलेंडरच्या ९ वा महिना अग्रहायण मधील हा अंतिम दिवस असून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये ह्या दिवशी ३० अग्रहायण ही तारीख असते. भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणेच ग्रेगोरीयन कॅलेंडरही सौर कॅलेंडर आहे.
मात्र ग्रेगोरीयन कॅलेंडरमध्ये खगोलशास्त्राला महत्त्व न देता ख्रिस्ती धर्माला महत्त्व दिल्याने सूर्याशी संबंधित महत्त्वाच्या ४ दिवसांपैकी एक दिवस असूनही ख्रिस्ती कॅलेंडरचा ना कोणता महिना या दिवशी सुरू होतो ना संपतो.
डिसेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५५ वा किंवा लीप वर्षात ३५६ वा दिवस असतो.
हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते.
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
- १८९८ - मारी आणि पिएर क्यूरी यांना रेडिअमचा शोध लागला.
- १९०५ - स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
- १९०९ - अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅकसनचा खून केला.
- १९१३ - पहिले शब्दकोडे 'न्यू यॉर्क वर्ल्ड' मध्ये प्रकाशित.
- १९६५ - दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
- १९८६ - रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
सतरावे शतक[संपादन]
- १६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.
विसावे शतक[संपादन]
- १९१३ - आर्थर विनचे वर्ड क्रॉस, हे पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित.
- १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.
- १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रॅंक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.
- १९७९ - ऱहोडेशियाच्या स्वातंत्र्यासाठीच्या ठरावाचा मसुदा लंडनमध्ये ठरला.
- १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
- १९८८ - लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन ऍम फ्लाइट १०३ या बोईंग ७४७ जातीच्या विमानात लॉकरबी, स्कॉटलंड वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.
- १९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ९५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली गाडी पकडली. तोरे पिकासो वरील हल्ला टळला.
- २००१ - देशावरील आर्थिक संकट आणि शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दे ला रुआची हकालपट्टी.
एकविसावे शतक[संपादन]
जन्म[संपादन]
- १७९५ - लेओपोल्ड फॉन रांक, जर्मन इतिहासकार.
- १८०४ - बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७९ - जोसेफ स्टालिन, १९२२ ते १९५३ पर्यंतसोवियेत युनियनचा नेता.
- १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती.प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक
- १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश
- १९३२ - ज्ञानपीठविजेते लेखक यू.आर. अनंतमूर्ती
- १९३२ - रेडिओ निवेदक अमीन सयानी
- १९३५ - बालसाहित्यिक दत्ता टोळ
- १९४२ - हू चिंताओ, चीनचे नागरी गणतंत्रचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - क्रिस एव्हर्ट-लॉईड, ब्रिटीश टेनिस खेळाडू.
- १९५९ - कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष
- १९६३ - सिनेअभिनेता गोविंदा
- १९६७ - मिखाइल साकाश्विलि जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू[संपादन]
- १२९५ - प्रोव्हान्सची मार्गेरित बेरेन्जर, फ्रांसचा राजा लुई नववा याची राणी.
- १३०८ - हेसीचा हेन्री पहिला.
- १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्सन
- १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.
- १९७९ - नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
- १९९३ - मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार
- १९९७ - पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक
- १९९७ - निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- २००४ - औतारसिंग पेंटल भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.
- १९१३ - आर्थर विन
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - (डिसेंबर महिना)