बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ
Appearance
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ - ७२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बल्लारपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. मूल, २ पोंभूर्णा, ३. बल्लारपूर हे तालुके व ४. चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर आणि चंद्रपूर रयतवारी या महसूल मंडळांचा समावेश होतो. बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
[संपादन]बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- बल्लारपूर तालुका
- मूल तालुका
- पोंभूर्णा तालुका
- चंद्रपूर तालुका : चंद्रपूर आणि चंद्रपूर रयतवारी महसूल मंडळ
बल्लारपूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]वर्ष | आमदार | पक्ष | |
---|---|---|---|
२००९ पूर्वी: चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग | |||
२००९ | सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | |||
२०१९ | |||
२०२४ | निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
बल्लारपूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार | भाजप | ८६,१९६ |
राहुल नरेश पुगलिया | काँग्रेस | ६१,४६० |
विनोद गजानन अहिरकर | अपक्ष | १०,९२१ |
डॉ. अमल सतीश पोद्दार | बसपा | १०,२४५ |
भरत सोमाजी थुलकर | अपक्ष | १,७०१ |
देवदत्त हंसराज रामटेके | रिपाई (आ) | १,५८० |
नाशिकराव रामचंद्र रामटेके | अपक्ष | ५९१ |
मुकुंदराव गोविंदा टेकाम | गोंगपा | ५८५ |
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ | ||
---|---|---|
बल्लारपूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार | भाजप | ६०,००० |
डॉ. झाडे | काँग्रेस | ५०,००० |
राजू झोडे | वंचित बहुजन आघाडी | ५५,००० |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).