नोटा (मतदान)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नोटा या पानावरून पुनर्निर्देशित)

नोटा (NOTA) म्हणजे 'NONE OF THE ABOVE' या इंग्रजी शब्द समूहाचे संक्षिप्त रूप होय. एखाद्या विशिष्ट निवडणुकीत पात्र मतदारातर्फे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरून मतदान करतांना हा पर्याय वापरण्याची भारतात मुभा आहे. यंत्राचे वर डकविलेल्या यादीतील उमेदवारांपैकी, कोणत्याही उमेदवाराला मत द्यावयाचे नसल्यास 'वरीलपैकी कोणीही नाही' हा पर्याय वापरण्यासाठी या बटणाचा(कळीचा) उपयोग केला जातो. ही कळ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात उमेदवारांचे यादीचे सर्वात शेवटी असते. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्यात येऊ लागले. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य झाल्या. ईव्हीएम मशीन वर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरील पैकी कोणी नाही 'नोटा' हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. जर 'नोटा' हा पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या ही अधिक असेल तर ती निवडणूक रद्द होते व निवडणूक पुन्हा घेण्यात येते. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारताच्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या पुस्तिकेतील कलम 4.4(b)- None of the Above’ :NOTA HANDBOOK FOR CANDIDATES (इंग्रजी मजकूर) Check |दुवा= value (सहाय्य). दि. ०७/०२/२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)